दुकानात बिस्किट खरेदी करायला गेली अन् झाली करोडपती, घटना वाचून आश्चर्याचा धक्का बसेल
Viral Story : एक महिला बिस्कीट खरेदी करायला घरातून निघाली होती. मात्र घरी परतताना ती करोडपती होऊन आली आहे. कारण बिस्किट खरेदी करायला गेलेल्या महिलेचे अचानक मन बदलले आणि तिने 800 रूपये खर्चुन लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. या लॉटरीत तिने 5.78 कोटी रुपयांची रक्कम जिंकली. कर कपात केल्यानंतर महिलेला चार कोटी रुपये मिळाले होते. या लॉटरीने ती मालामाल झाली होती.
Viral Story : कोणाच नशीब कधी बदलेल हे सांगता येत नाही. कारण क्षणार्धात एखाद्या व्यकीला खुप मोठे नुकसान होऊन तो कर्जबाजारी होऊ शकतो, तर क्षणार्धात एखादा व्यक्ती करोडपती होऊ शकतो. अशीच एक अनपेक्षित घटना समोर आली आहे. या घटनेत एक महिला दुकानात गेली आणि 6 कोटी रूपये जिंकून आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे काही सेकंदात एक महिला करोडपती झाली आहे. ही घटना वाचून अनेकांना त्याच्यावर विश्वास बसत नाही आहे.
दुकानात बिस्किट खरेदीला गेली
एक महिला बिस्कीट खरेदी करायला घरातून निघाली होती. मात्र घरी परतताना ती करोडपती होऊन आली आहे. कारण बिस्किट खरेदी करायला गेलेल्या महिलेचे अचानक मन बदलले आणि तिने 800 रूपये खर्चुन लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. या लॉटरीत तिने 5.78 कोटी रुपयांची रक्कम जिंकली. कर कपात केल्यानंतर महिलेला चार कोटी रुपये मिळाले होते. या लॉटरीने ती मालामाल झाली होती.
महिला काय म्हणाली?
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथील विल्सन येथील रहिवासी असलेल्या डोना डेंटन यांनी 23 सप्टेंबर रोजी फ्रेमोंट फूड मार्टमधून 'ट्रिपल 777 लॉटरी तिकीट' खरेदी केले होते. ती खरंच बिस्किटे खरेदी करायला गेली होती, पण तिने अचानक लॉटरीची तिकिटे घेण्याचा निर्णय घेतला, असे डोना म्हणाली. जेव्हा तिने हे लॉटरीचे तिकीट स्क्रॅच केले तेव्हा तिचे नशीब पालटले, तिने या तिकिटातून सुमारे 6 कोटी रुपयांचा जॅकपॉट जिंकला. डोनाला तिच्या नशिबावर विश्वास बसत नव्हता, म्हणून ती घरी गेली आणि तिने तिच्या पतीला लॉटरी जिंकलेल्या गोष्टी पुन्हा एकदा तपासण्यास सांगितले. त्यानंतर पतीनेही विजयाला दुजोरा दिला.
चर्चला अर्धी रक्कम दान करणार
पतीने लॉटरी जिकंल्याचा दुजोरा दिल्यानंतर डोनाने लॉटरी कंपनीशी संबंधित लोकांशी संपर्क साधला आणि स्वतः विजेता असल्याबद्दल सांगितले.फ्रेमोंट फूड मार्टनेही पुष्टी केली की त्यांनी हे तिकीट डोनाला विकले. आणि अशी डोना करोडपती झाली. या विजयावर ती म्हणाली, आम्ही आनंदी होतो. या बक्षीस रकमेमुळे ख्रिसमस चांगला झाला आहे.आता ती जिंकलेल्या रक्कमेपैकी काही स्थानिक चर्चला दान करेल.
दरम्यान आता डोनाने लॉटरी जिंकल्यानंतर ती करोडपती झाली आहे. तिची चर्चा संपुर्ण शहरात होते आहे.