Cancer Patients Video Viral : हा दिवस म्हणजे 4 फेब्रुवारी जगभरात जागतिक कर्करोग दिन (World Cancer Day 2023) म्हणून ओळखला जातो. यामागचा उद्देश लोकांना कॅन्सरबद्दल जागरूक करणे हा आहे. युनियन ऑफ इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल (UICC) ने या दिवसाची घोषणा केली. जगभरातील लोकांमध्ये या रोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी या दिवशी अनेक कार्यक्रमाचे आयोजन केलं जातं. हा जीवघेणा रोग असल्याने अनेक जण यामुळे मानसिकरित्या खचून जातात. पण असे अनेक रुग्ण आहेत ज्यांनी या कॅन्सरशी (Cancer Patients Video) दोन हात करत त्यावर मात केली आहे. पण कॅन्सरग्रस्तांना या आजारात लढण्यासाठी भावनिक आधाराची खूप गरज असते. झी२४ तास वेबने एक व्हिडीओ जगासमोर आणला होता त्यानंतर तो सोशल मीडियावर (Viral Video) तुफान व्हायरल झाला. 


त्याची ती अनमोल साथ!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुठल्याही कठीण प्रसंगी माणसांना लढण्यासाठी मानसिक, भावानिक आधाराची खूप गरज असते. प्रत्येक पावलावर संकटात जर आपल्याला साथ देणारी एकही व्यक्ती असली तरी आपण अख्ख जग जिंकू शकतो अशी सकारात्मक विचार येतात. कुठल्याही कॅन्सर रुग्णांसाठी ही लढाई खूप मोठी असते. एक एक टप्प्यावर रुग्ण खचत जातो. त्यात सगळ्यात मोठा घात तेव्हा होतो जेव्हा केमोथेरपी सुरु होते. या उपचारात रुग्णाचे केस गळतात. पर्यायी रुग्णाने केस काढून टाकतात. 


डोळे पाणवतात!


महिला रुग्णांसाठी ही लढाई अजून कठीण असते. महिलांना आपले केस खूप प्रिय असतात. शिवाय या केसाने त्यांचं रुप खुलून दिसतात. मग कॅन्सरशी लढा देताना या केसाचा त्याग करावा लागतो. आजकाल अशा रुग्णांसाठी अनेक जण आपल्या केस कापून त्यापासून विग तयार केले जातात. पण आपले केस जेव्हा सलूनमध्ये जाऊन टक्कल केलं जातं यापेक्षा जास्त घातक काही नसतं. अशावेळी रुग्णाचा आत्मविश्वासाला तडा जातो. तो तुटून जातो...पण अशातच तुमचं एक कृत्य त्याला व्यक्तीला मोठा आधार घेऊन जातो. (World Cancer Day 2023 barber shaves off own hair for cancer patient trending video viral on social media)


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका सलूनमध्ये कॅन्सरग्रस्त महिलेचे केस काढले जात आहे. ती ढसाढसा रडतेय...सलूनवाल्याचे हातही थरथरत असतात. तोही अनेक वेळा भावूक होतो तिला हृदयाशी धरतो. पण केस काढावेच लागणार...तिचं रडणं थांबत नसते...ती मनाने पूर्णपणे खचलेली असते. अशातच तो सलूनवाला त्याचा डोक्यावरही मशीन फिरवतो. 



त्याचं हे कृत्य पाहून महिलाला आश्चर्याचा धक्का बसतो. पण तिच्या या लढाई त्याने दिलेली ही साथ खूप अनमोल असते. तिला या लढाई या सलूनवाल्याची ही साथ मोठा आधार देते. आपण प्रत्येकाने या रुग्णांसाठी अगदी कुठल्याही रुग्णांसाठी आपल्याला जमेल तसं काही तरी करुन त्यांना साथ दिली पाहिजे.