मुंबई : कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचं अनेक ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान होण्याचा अंदाज आहे. संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालात या गोष्टी समोर आल्या आहेत. अहवालानुसार विकसनशील देशांना या परिस्थितीत मोठी समस्या भेडसावणार आहे, परंतु चीन आणि भारत सारखे हे देश याला अपवाद ठरतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यूएनसीटीएडीच्या सरचिटणीस यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना विषाणूमुळे होणारी आर्थिक घसरण अजूनही सुरूच आहे. येणाऱ्या काळात हे अधिक वेगाने वाढेल, ज्याचा अंदाज बांधणे कठीण आहे.


चीन आणि भारताचे काय होईल - सद्य परिस्थिती पाहता जगातील गरीब आणि विकसनशील देशांना आर्थिक मंदीवर मात करण्यासाठी सुमारे २ ट्रिलियन डॉलर्सची गरज लागेल असा अंदाज संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास मंडळाने (यूएनसीटीएडी) व्यक्त केला आहे. विकसनशील देशांना ही परिस्थिती सामान्य होण्यासाठी 2 वर्षांचा कालावधी लागू शकेल, असेही संस्थेने म्हटले आहे.


जी -20 देशांच्या मते, त्यांनी त्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी सुमारे 375 लाख कोटीचं मदत पॅकेज जाहीर केले आहे. यूएनसीटीएडीने म्हटलं की, 'हे एक मोठे संकटात घेतले गेलेले अभूतपूर्व पाऊल आहे, यामुळे या संकटाला आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या सामोरे जाण्यास मदत होईल.