दुबई : जगातील सर्वात लठ्ठ महिला असलेल्या इजिप्तच्या इमान अहमदचा मृत्यू झालाय. अबूधाबीमध्ये उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. अबुधाबीच्या बर्जिल रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. रिपोर्टसनुसार, आज सकाळी ४ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास तिचे निधन झालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अबुधाबीत उपचार घेण्याआधी इमानवर मुंबईतल्या चर्नीरोड इथल्या सैफी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. ११ फेब्रुवारीला इमानला सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. इमान आली तेव्हा तिचं वजन तब्बल पाचशे किलो होतं.  मुंबईत तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर तिचं वजन १७१ किलोंपर्यत कमी झालं होतं.