Trending News: एकाच दिवसात 13 दात काढले, 12 कृत्रीम दात बसवले, पण तेरा दिवसांनी ती व्यक्ती...
Dental Surgery News : दात दुखीच्या कळा अतिशय वेदनादायी असतात. या संबंधीच एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. दात दुखीमुळे त्रस्त असलेली एक व्यक्ती दातांच्या डॉक्टरकडे गेली. डेंटिस्टने एकाच दिवसात त्या व्यक्तीचे तेरा दात काढले पण तेरा दिवसांनी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.
Trending News in Marathi: दात दुखीने त्रस्त असलेल्या एका व्यक्तीला दातांच्या डॉक्टरकडून (Dentist) उपचार घेणं जीवावर बेतलंय. दात काढल्यानंतर तेरा दिवसांनी या व्यक्तीचा मृत्यू झाला. डॉक्टरने एकाच दिवसात त्या व्यक्तीचे तेरा दात काढले तर 12 कृत्रीम दात (Artificial Teeth) बसवले. पण घरी गेल्यानंतर या व्यक्तीची प्रकृती ढासळली दात काढल्यामुळे प्रकृती बिघडली असावी असं त्याच्या कुटुंबियांना वाटलं. पण तेरा दिवसांनी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेने त्या व्यक्तीच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. चुकीच्या पद्धतीने उपचार केल्याने मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.
मुलीने लिहिली पोस्ट
चीनमधली ही घटना आहे. मृत व्यक्तीच्या मुलीने वडिलांच्या मृत्यूसंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट (Social Media Post) शेअर केल्याने ही घटना उघडकीस आली. आपल्या पोस्टमध्ये तिने म्हटलंय 'वडिल दात दुखीने त्रस्त होते. यासाठी ते योंगकांग डेवे डेंटर हॉस्पीटलमध्ये उपचार घेण्यासाठी गेले. तपासणी केल्यानतंर डेंटल सर्जनने (Dentl Surgeon) त्यांना दाढ आणि दात काढावे लागतील असं सांगतिल. त्या डॉक्टरला पाच वर्षांचा अनुभव होता, त्यामुळे आपले वडिल त्यांच्या रुग्णालयात गेले' असं मुलीने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय.
एकाच दिवसात काढले 13 दात
पुढे मुलीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय 'दात काढण्याचा सल्ला दिल्यानंतर वडिल तयार झाले. पण डेंटल सर्जनने एकाच दिवसात त्यांचे 13 दात काढले. त्या जागी जखमी झाल्या. जखमा सुकण्यासाठी काही अवधी जाऊ न देता त्यांनी 12 कृत्रिम दातांचं प्रत्यारोपण केलं. त्यानंतर वडिलांना घरी पाठवण्यात आलं. पण यानंतर आपल्या वडिलांची प्रकृती ढासळली. दात दुखीचा आणखीनच वाढला. त्यानंतर 13 दिवसांनी त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यांचा मृत्यू झाला'
आरोग्य विभाग तपास करणार
ही घटना उघडकीस आल्यानतंर रुग्णालयाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. याप्रकरणी आपले वकिल उत्तर देतील असं रुग्णालयाकडून सांगण्यात आलंय. पण चीनच्या आरोग्या विभागाने ही बाब गांभार्याने घेतली असून चौकशीचे आदेशि दिले आहेत. दांत काढल्यानंतर 13 दिवसांनी त्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला त्यामुळे त्यांचा मृत्यू नेमका दात काढल्यामुळेच झाला की नाही याबाबत स्पष्टता नाही, याची सखोल चौकशी करण्यात येईल आणि दोषी आढळल्यास रुग्णालयावर कारवाई केली जाईल असं आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.