चीनमध्ये अचानक काय घडलं असं? रस्त्यावर भयाण शांतता आणि भरदिवसा लावले दिवे
बीजिंगमध्ये आपत्कालीन परिस्थितीमुळे `येलो अलर्ट` जारी करण्यात आला.
बीजिंग : चीनची राजधानी बीजिंगमध्ये अचानक असं वातावरण झालं की, लोकं आश्चर्यचकीत झाले. रस्त्यावर भयाण शांतता झाली. दिवसाच रस्त्यावरील दिवे लावावे लागले. लोकांना हेडलाईट लावून वाहने चालवावी लागली. तरीही काही दिसत नव्हतं. शहरात आपत्कालीन परिस्थितीमुळे 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला.
10 वर्षातील सर्वात खतरनाक सॅन्डस्टॉर्म
चीनची राजधानी बीजिंगमध्ये मागील 10 वर्षातील सर्वात धोकादायक सॅन्डस्टॉर्म आला आहे. या धूळीच्या वादळामुळे बीजिंग शहरातील दृश्यता खुपच कमी झाली.
शहर पिवळ्या रंगाच्या हलक्या प्रकाशाने झाकले गेले. हवेतील धूळीच्या कणांमुळे एअर क्वॉलिटी इंडेक्स (AQI)500 च्या पार गेला आहे. तज्ज्ञांनी आरोग्याच्या दृष्टीने हे धोकादायक वातावरण असल्याचे म्हटले आहे.
400 पेक्षा अधिक उड्डाने रद्द
स्थानिक हवामान खात्याने म्हटले आहे की, मागील एका दशकात एवढे भयावह वाळूचे वादळ कधीही आले नव्हते. बीजिंगच्या या सहा डाऊनटाउन जिल्ह्यांमध्ये PM10 कणांची अधिक झाली आहे. बीजिंगच्या आंतरराष्ट्रीय विमातळावरील 400 पेक्षा अधिक उड्डाने रद्द करण्यात आली आहे.
वाळूच्या वादळांचे कारण काय ?
मंगोलियाच्या पठारांवरून उडालेल्या धूळीमुळे चीनमध्ये धूळीचे वादळे आली आहेत. चीनच्या मेट्रोलॉजिकल विभागाने सोमवारी बीजिंग आणि आजूबाजूच्या परिसरात येलो अलर्ट जारी केला आहे.