मुंबई : जगभरात 28 सप्टेंबरला रेबीज दिवस (World Rabies Day) साजरा केला जातो. तुम्हाला माहितीये, फ्रांसचे शास्रज्ञ लुई पाश्चर यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी साजरा केला जातो? याचं कारण म्हणजे, रेबीजची लस सर्वप्रथम निर्माण केली होती आणि म्हणून त्यांना 'फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी' नावाने ओळखलं जातं. रेबीज हा रोग संसर्गातून किंवा कुत्र्याच्या चाव्यामुळे परसतो. जागतिक रेबीज दिवासानिमित्त आज आम्ही तुम्हाला रेबीज आणि कुत्र्याच्या चाव्याबद्दल काही फॅक्ट्स सांगणार आहोत.


'या' भागांवर कुत्रे चावा घेतात...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुत्र्यांना जेव्हा चावा घ्यायचा असतो, त्यावेळी कुत्रे त्या व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवतात. उदा. जर कुत्र्याच्या हल्ल्यादरम्यान व्यक्तीने पळण्याचा प्रयत्न केला किंवा हाताने कुत्र्याला घाबरवायचा प्रयत्न केला तर कुत्रे त्या व्यक्तीच्या अंगावर हल्ला करतात आणि पंज्याने किंवा दाताने त्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न करतात. सोप्प्या शब्दांत सांगायचं झालं तर, कुत्रे हा व्यक्तीच्या अशाच भागावर हल्ला करतात ज्या ठिकाणापासून त्यांना धोका जाणवतो. 


कुत्र्याने चावा घेतल्यास काय करावं?


कुत्राने चावा घेणे हे खुप धोकादायक असतं. यामुळे व्यक्तीला मानसीक आजार किंवा मृत्यूचा देखील धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून, जर कुत्र्याने चावा घेतल्यास लवकरात लवकर त्यावर उपचार करायला हवा. जर तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला कुत्र्याने चावा घेतला असेल तर लवकरात लवकर डॉक्टरकडे जायला हवं. काही कारणांमुळे डॉक्टरकडे जाणं शक्य होत नसेल तर अशावेळी, तुम्ही हे उपाय करु शकता. 
- ज्या भागात कुत्र्याने चावा घेतला असेल त्या भागाला अँटिसेप्टिकने स्वच्छपणे धूवून घ्या.
- चावा घेतलेल्या ठिकाणी लाल मिर्च पावडर लावा, यामुळे तुम्हाला त्रास होईल पण यामुळे संक्रमण पसरण्यापासून आळा बसेल.
- कांदा किंवा लसणाचा लेप देखील चावा घेतलेल्या जखमेवर लावा.
- मधामध्ये काळी मिर्ची पावडरला एकत्र करुन त्याला जखमेवर लावा.


डॉक्टरशी संपर्क करा


कुत्र्याने चावा घेतल्यानंतर त्याचं संक्रमण जलद गतीने पसरतं. म्हणून, कुत्र्याने चावा घेतल्यावर लवकरात लवकर डॉक्टरशी संपर्क साधा. आम्ही सांगतलेले घरगुती उपचार हे संक्रमणावर आळा घालण्यासाठी उपयोगी करतात. हे उपचार म्हणजे प्रमुख किंवा मुख्य उपचार नाहीयेत. यामुळे लवकरात लवकर डॉक्टरशी संपर्क करायला हवा.


(Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)