वॉशिंग्टन :  भारत (India), मलेशिया, इंडोनेशिया आणि फिलिपिन्स यासारख्या आशियाई देशांना चीनकडून वाढत असलेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिका (America) जगभरातील आपल्या सैन्याच्या तैनातीचा आढावा घेईल, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यांनी गुरुवारी सांगितले. अशा प्रकारे तैनात करण्यात येणाऱ्या सैन्याचा आढवा घेतल्यानंतर, गरज पडल्यास ते पीपल्स लिबरेशन आर्मी (चिनी सैन्य) यांच्याशी स्पर्धा करु शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर्मन ब्रुसेल्स फंडच्या व्हर्च्युअल ब्रुसेल्स फोरम २०२० मधील एका प्रश्नाच्या उत्तरात माइक पोम्पिओ यांनी याबाबत सांगितले. पोम्पीओ म्हणाले, 'आम्ही हे सुनिश्चित करू की आमच्या सैन्याची तैनाती अशी आहे की पीएलएला विरोध करता येईल. आम्हाला वाटते की हे आजच्या काळाचे आव्हान आहे आणि आम्ही योग्य ठिकाणी सामना करण्यासाठी आमच्याकडे सर्व संसाधने उपलब्ध असल्याचे सुनिश्चित करु् '


ते म्हणाले की, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सूचनेनुसार सैन्याच्या तैनातीचा आढावा घेण्यात येत आहे. या योजनेंतर्गत अमेरिका जर्मनीमध्ये आपल्या सैन्यांची संख्या ५२ हजार वरून २५ हजारांवर आणत आहे.


पोम्पीओ म्हणाले की, सैन्य तैनात करणे ही आजच्या वास्तविक परिस्थितीवर आधारित असेल.  काही ठिकाणी अमेरिकन संसाधने कमी होतील. तर इतर काही ठिकाणी देखील संसाधने असतील. मी नुकताच चिनी कम्युनिस्ट पक्षाशी या धोक्याबद्दल बोललो आहे, म्हणून आता भारताला धोका आहे, व्हिएतनामला धोका आहे, मलेशिया, इंडोनेशियाला धोका आहे, दक्षिण चीन समुद्राची आव्हाने आहेत.