पृथ्वीवरील अनेक रहस्य उलगडणार; 385 दशलक्षवर्ष जुनं जंगल सापडलं, जंगलात 38 कोटी वर्षे जुने खडक
World`s Oldest Forest :न्यूयॉर्कजवळ दुर्गम खाणीत आढळलं जगातील सर्वात जुनं जंगल सापडले आहे. हे जंगल 385 दशलक्ष वर्ष जुनं आहे.
385-Million Year Old Forest : जंगलं, वनसंपदा ही पृथ्वीची फुफुस्सं मानली जातात. न्यूयॉर्कमधल्या शास्त्रज्ञांना अशाच एका जंगलाचा शोध लागलाय. हे जंगल तब्बल 385 दशलक्षवर्ष जुनं जंगल असल्याचं सांगण्यात येतंय. सध्या याठिकाणी मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. या संशोधनातून पृथ्वीवरील अनेक रहस्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
385 दशलक्ष वर्ष जुनं जंगल
जगभरात अशी अनेक ठिकाणं आहेत जी अजूनही माणसांपासून दूर आहेत. शास्त्रज्ञांनी नुकताच जगाला आश्चर्यचकित करणारं एक असं ठिकाण शोधून काढलंय. जे ठिकाण जगातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक असलेल्या न्यूयॉर्कपासून दोन तासांच्या अंतरावर आहे. लाखो वर्षांपूर्वी गायब झालेली जंगलं इथं आहेत. शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हे जगातील सर्वात जुनं जंगल आहे. हे जंगल 385 दशलक्ष वर्ष जुनं जंगल असल्याचं सांगण्यात येतं.
38 कोटी वर्षे जुने खडक
2009 मध्ये कैरो शहराजवळील कॅटस्किल पर्वतातील खुल्या खड्ड्यातील खाणींमध्ये त्याचा शोध लागला होता. त्याचा शोध लागल्यानंतर या भागातील झाडं आणि वनस्पतींचं नेमकं वय शोधण्याचा तज्ज्ञांचा प्रयत्न होता. इथले खडक सुमारे 38 कोटी वर्षे जुने आहेत. या खडकांच्या खाली मोठ्या जागेत जिवाश्मांचा खजिना आहे. म्हणजे लाखो वर्षे ते दडपले गेले. इथं अशी जंगलं आहेत, जी डायनासोरनं देखील पाहिली असतील. हे ठिकाण पाहिल्यानंतर सुरूवातीला संशोधकांनाही आश्चर्याचा धक्का बसला.
अनेक रहस्ये दडली आहेत या जगंलात
हे जंगल न्यूयॉर्कमधील जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिजपासून अवघ्या दोन तासांच्या अंतरावर आहे. एकेकाळी हे जंगल सुमारे 250 मैलांच्या परिसरात पसरलं होतं. सध्या फुटबॉल मैदानाच्या निम्मं क्षेत्रफळ असलेल्या या भागात अतिशय लहान जागेवर काम केलं. संशोधकांच्या मते जेव्हा तुम्ही इथून जाता तेव्हा तुम्ही जुन्या झाडांच्या मुळांवरून जात आहात. हे ठिकाण अॅमेझॉन रेनफॉरेस्ट किंवा जपानच्या याकुशिमा जंगलासारखं मानलं जातं. सध्या लोकांना या ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आलीय. इथं केवळ शास्त्रज्ञांना अभ्यासासाठी जाण्याची परवानगी आहे. त्या काळातील अनेक रहस्ये इथं दडली असण्याची शक्यता आहे. अपेक्षा आहे की शास्त्रज्ञांच्या संशोधनानंतर यातील बरीचशी गुपितं जगासमोर येतील.