न्यूयॉर्क : संशोधकांनी आधुनिक जैवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने कमाल करत हा टेप रेकॉर्डर बनवला आहे. 


नैसर्गिक प्रतिकारक्षमतेचं रुपांतर टेप रेकॉर्डरमध्ये


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संशोधकांनी मानवी शरीरातल्या जीवाणूमध्ये बदल करत हे साध्य केलं आहे. हा याद्वारे विषाणू त्याच्या पर्यावरणाशी निगडीत सर्व गोष्टींची वेळेनिशी नोंद ठेऊ शकणार आहे. संशोधकांनी जीवाणूंच्या नैसर्गिक प्रतिकारक्षमतेचं रुपांतर जगातल्या सर्वात लहान टेप रेकॉर्डरमध्ये केलं आहे. कोलंबिया युनिव्हर्सिटी मेडीकल सेंटरच्या संशोधकांनी हे संशोधन केलं आहे.


भविष्यातल्या टेक्नोलॉजी


यामुळे भविष्यातल्या अनेक तंत्रज्ञानासाठी दरवाजे उघडले गेले आहेत. यापुढच्या काळात शास्त्रज्ञ जीवाणूंच्या पेशींचा वापर आजार बरे करण्यापासून ते पर्यावरणाचं निरिक्षणापर्यंत अनेक गोष्टींमध्ये करू शकतील. 


या शोधाचा उपयोग


अशाप्रकारचे जीवाणू पेशंटच्या पोटात सोडल्यानंतर ते संपूर्ण पचनसंस्थेतून अत्यंत महत्वाची गोळा करून आतापर्यंत कधीही समोर न आलेलं गुपीत आपल्यासमोर उघडतील.
याचा आणखी एक उपयोग म्हणजे पर्यावरणातील आणि जीवसृष्टीतील आतापर्यंत मानव जातीला कधीही न कळलेल्या रहस्यांची उकल होईल. या मॉडीफाईड जीवाणूंचा वापर करून मानवाला पर्यावरणातील आणि जीवसृष्टीतील अदृश्य बदल कोणतीही छेडछाड न करता अभ्यासता येतील.