Chandrayaan 3 Landing on moon : भारताकडून अवकाशात पाठवण्यात आलेल्या चांद्रयानानं अखेर निर्धारित टप्पा गाठला आणि संपूर्ण जगभरात या ऐतिहासिक क्षणाचा उत्साह पाहायला मिळाला. चंद्राचं दक्षिण ध्रुव गाठणारा भारत पहिला, तर चंद्रावर यशस्वीपणे यान उतरवणारा चौथा देश ठरला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांनी अथक परिश्रमांनंतर प्रचंड जिद्द आणि चिकाटीनं ही मोहिम यशस्वी करून दाखवली. जगभरातून सध्या या मोहिमेशी संबंधित प्रत्येकावर, किंबहुना प्रत्येत भारतीयावरही कौतुकाचा वर्षाव होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडिया म्हणू नका किंवा आणखी कोणतंही माध्यम. सर्वत्र चांद्रयान, विक्रम लँडर, प्रज्ञान रोवर, इस्रो हेच शब्द कानी पडत आहेत. तर, जागतिक स्तरावर चर्चेत असणाऱ्या मंडळींनीही या ऐतिहासिक कामगिरीची दखल घेतली असून, त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये X (पूर्वीचं ट्विटर) चे CEO एलॉन मस्क यांनीसुद्धा आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. पण, ही प्रतिक्रिया विक्रम लँडर चंद्रावर उतरण्याआधीची असून, ती चर्चेत मात्र चांद्रयानाच्या लँडिंगनंतरच आली. 


मस्कचं म्हणणं तरी काय? 


मस्कनं X वरील एका माहितीपर संदर्भावर आपली आपली प्रतिक्रिया दिली ज्यामध्ये चांद्रयानाचा उल्लेख करण्यात आला होता. 'आश्चर्यच वाटतं जेव्हा तुमच्या लक्षात येतं की, चांद्रयानासाठी भारतानं इंटरस्टेलर या हॉलिवूडपटाहून कमी खर्च केला'. इथं चांद्रयानाचा खर्च साधारण Rs 615 कोटी रुपये ($75 million) आणि या हॉलिवूड चित्रपटाचा निर्मिती खर्च $165 million इतका असल्याची तुलनाही करण्यात आली. यावर व्यक्त होत मस्कनं Good for India असंच लिहिलं आणि सोबत तिरंगा जोडला. 


 हेसुद्धा वाचा : चांद्रयान-3 च्या यशानंतर आता सूर्य, शुक्राची पाळी; इस्रोची 'अशी' असेल संपूर्ण मोहीम


 


आता त्याची ही प्रतिक्रिया नेमकी कोणत्या हेतूनं होती हे तोच जाणतो. पण, ती चर्चेचा विषय ठरली हे मात्र खरं. 'इंटरस्टेलर' हा जगविख्यात दिग्दर्शक क्रिस्तोफर नोलान याच्या दिग्दर्शनात साकारलेला चित्रपट असून, या चित्रपटानं जगभरातील प्रेक्षकांची दाद मिळवली होती. 



चांद्रयानाचा पहिला संदेश... 


मस्क काहीही म्हणो, भारताचं हे यश कायमस्वरुपी लक्षात राहील असंच आहे. चांद्रयान 3 नं जेव्हा चंद्रावर पाऊस ठेवलं तेव्हा, 'मी माझ्या निर्धारित ठिकाणावर पोहोचलो आहे आणि तुम्हीसुद्धा' असा सुरेख संदेश पाठवला. हा तोच क्षण होता जेव्हा चांद्रयान 3 च्या विक्रम लँडरनं चंद्राचा दक्षिण ध्रुव गाठला आणि प्रज्ञान रोवरही चंद्रावर पोहोचला. आश्चर्याची बाब म्हणजे या यशाची मोहोर अर्थात भारताची राजमुद्राही चंद्रावर उमटली.