सना : येमेनमधील होथी बंडखोरांनी मॉडेलचे अपहरण केले आहे. ही मॉडेल वीस वर्षांची असून तिचे नाव येमेनी इंतिसार अल-हम्मदी आहे. सोशल मीडियावर विना हिजाबचे फोटो शेअर केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आलाय. ती चरीत्रहिन असल्याचे सांगत बंडखोरांनी तिचे अपहरण केले. हूत्ती बंडखोर त्या मॉडेलची वर्जिनीटी टेस्ट करण्याच्या तयारीत आहेत. त्यानंतरच ते तिच्या सुटकेबाबत निर्णय घेणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रॉयटर्सने अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, इराण समर्थीत होथी बंडखोरांनी 20 वर्षीय मॉडेलचे अपहरण केलंय. हिजाब न घालता फोटो शेअर केल्याने तिची जबरदस्तीने कौमार्य चाचणी केली जाईल.


येमेनी इंतिसार अल-हमादीला फेब्रुवारी महिन्यात राजधानी साना येथील एका चौकीवरून अटक करण्यात आली होती. ही जागा हुत्ती बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या भागात येते.



हुत्ती बंडखोरांनी अपहरण केलेल्या मॉडेलवर बरेच आरोप केले आहेत. ती मॉडेल अश्लील कृत्य केल्याचा आणि इस्लामिक तत्त्वांच्या विरोधात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. अल-हम्मदी नियमितपणे आपले फोटे सोशल मीडियावर पोस्ट करत असते. जे इस्लामिक दृष्टिकोनातून चुकीचे आहे. अहवालानुसार मॉडेलवर दबाव आणून त्यांनी तिला अनेक गुन्ह्यांची कबुली देण्यास भाग पाडले आहे.


हुती बंडखोरांनी मनमानी करुन लोकांना ताब्यात घेतल्याचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. टीकाकार, कार्यकर्ते, पत्रकार आणि धार्मिक अल्पसंख्यांकांच्या सदस्यांना शांत करण्याची किंवा शिक्षा दिल्या आहेत. तसेच त्यांनी केलेल्या अत्याचाराच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. या व्यतिरिक्त, हुत्ती बंडखोर त्यांच्या विरोधकांना निर्घृणपणे मारण्याबाबत कुख्यात आहेत.