Man Marries Son Girlfriend : प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं असं म्हणतात. असे म्हणतात की प्रेमात विश्वासघातापेक्षा वेदनादायक दुसरं काहीही नसतं. विचार करा ज्या व्यक्तीवर आपण जीवापाड प्रेम केलं तो व्यक्ती कोणा दुसऱ्यावर प्रेम करते. यापेक्षा धक्कादायक आणि आयुष्यात संपवणारी भावना नसते. प्रेमातील असाच एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय. त्या दोघांच्या नात्यात तिसरा व्यक्तीला अन् तोही दुसरा तिसरा कोणी नसून त्याचे वडील आहे. विचार करा त्या व्यक्तीचं काय झालं असेल. ही प्रेम कहाणी आहे, चीनमधील एका मुलाची. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुला वडिलांना आपल्या गर्लफ्रेंडला भेटायला घरी घेऊन आला. त्यावेळी वडिलांनी त्याची गर्लफ्रेंड कुटुंबासाठी आणि त्याच्यासाठी कशी चांगली नाही, असं सांगितलं. त्यासोबतच मुलाला गर्लफ्रेंडशी ब्रेकअप करायला लावलं. पण ही कहाणी इथेच थांबत नाही. काही दिवसांनी ज्या मुलीला वडिलांनी कुटुंबासाठी चांगली नाही असं सांगितलं त्याच मुलीशी वडिलांनी लग्न केलं. हे पाहून मुलाला मोठा धक्का बसला. 


हा व्यक्ती आहे 63 वर्षीय लिऊ लियांघे यांच्याबद्दल, जे 'बँक ऑफ चायना'चे माजी अध्यक्ष आहेत. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, माजी बँकरचं हे चौथे लग्न असून प्रत्येक वेळी त्यांनी तरुणीची निवड केलीय. लिऊ पहिल्यांदा त्याच्या चौथ्या पत्नीला भेटला जेव्हा त्याच्या मुलाने तिची गर्लफ्रेंड म्हणून कुटुंबाशी ओळख करून दिली होती.


मात्र, त्यानंतर लिऊने आपल्या मुलाला ही मुलगी आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीसाठी योग्य नसल्याचे सांगून नातं संपवण्यास पटवलं. त्यानंतर मुलगा दु:खी झाला आणि ब्रेकअप झालं. पण सहा महिन्यांनंतर, जेव्हा त्याला समजलं की त्याच्या वडिलांनी त्याच मुलीशी लग्न केलं आहे जिच्याबद्दल त्याने सांगितलं होतं की त्यांना ती आवडत नाही.


भ्रष्टाचाराच्या आरोपात फाशीची शिक्षा


रॉयटर्सच्या वृत्तानुसार, भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली लिऊ यांना नोव्हेंबरमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्याने आणि लाचेची बहुतेक मालमत्ता जप्त करण्यात आल्याने त्याला दोन वर्षांनी फाशी देण्यात येणार आहे. माजी बँकर लिऊ यांच्यावर 141 कोटींहून अधिक लाच घेतल्याचा आणि सुमारे 3,735 कोटी रुपये बेकायदेशीरपणे कर्ज दिल्याचा आरोप होता.


कुप्रसिद्ध बँकरचे रोमँटिक जीवन


यानंतर हे उघड झालं की लिऊ हे केवळ भ्रष्ट बँकरच नव्हते तर त्यांचे रोमँटिक जीवनही तितकंच विकृत होतं. असं म्हटलं जातं की त्याचं सुरुवातीचे यश त्याच्या पहिल्या पत्नीच्या प्रभावामुळे होते. जी एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याची मुलगी होती. पण त्याला ओळख मिळताच लिऊने आपल्या पत्नीचा त्याग केला आणि आपल्या धाकट्या मालकिणीशी लग्न केलं. इतकंच नाही तर ऑफिसमध्ये आपल्या अनेक महिला अधीनस्थांशी घनिष्ठ संभाषण केल्याचा आरोपही लिऊवर आहे.