मुंबई : फेसबुकवर माल्लू अॅपची सध्या चांगलीच चलती आहे.  माल्लू अॅप्सशी संबंधित अनेक प्रश्न मजेदार आहेत, शिवाय त्याची उत्तरंही मजेदार येत असल्याने, फेसबुकवर असणारी तरूणाई याचा आनंद घेत आहे. यामुळे फेसबुकवर काही प्रमाणात युवकांचं थांबण्याचं प्रमाण वाढलं आहे. 


जेवढे प्रश्न मजेदार, तेवढीच उत्तरंही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे आपल्यातील काही जण हे प्रश्न बनवतात आणि त्यांची उत्तरही येथेच असतात, प्रश्न जेवढे मजेदार असतात, तेवढीच उत्तर देखील मजेदार असतात. 


तरूणांना आकर्षित करतंय माल्लू अॅप


तुम्ही कोणत्या क्षेत्रात करिअर केलं पाहिजे, अशा प्रश्नाचं चोर असंही उत्तर येऊ शकतं, एकंदरीत माल्लू अॅपस मजेदार असलं, तरी तुमचा फेसबुकवरील डाटा अशा साईट्सकडे जातो का? हे देखील पाहणे महत्वाचे आहे.