सुंदर ते ध्यान..! आषाढी एकादशीला विठ्ठल मंदिरात जाणं झालं नाही, तर घरच्या घरी करा अशी पूजा, पाहा VIDEO

Ashadhi Ekadashi Puja Video : राज्याच सर्वत्र जोरदार पाऊस सुरु झाला आहे. अशातच आषाढी एकादशीला विठुरायाचा मंदिरात जाणं होणार नाही. मग नाराज होऊन नका, घरच्या घरी व्हिडीओ पाहून करा सावळ्या विठुरायाची पूजा...

Updated: Jun 28, 2023, 05:18 PM IST
सुंदर ते ध्यान..! आषाढी एकादशीला विठ्ठल मंदिरात जाणं झालं नाही, तर घरच्या घरी करा अशी पूजा, पाहा VIDEO title=
Ashadhi Ekadashi Vitthal Rukmini Mandir ekadashi pooja at home Puja marathi mantra video

Ashadhi Ekadashi Puja at Home: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरनगरी विठुमय झाली आहे. गुरुवारी 29 जूनला आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे. विठुरायाचे सावळे रुप डोळ्यात सामविण्यासाठी वारकरी लाखो संख्येने पंढरपुरात दाखल झाले आहे. पंढरपूर नगरीत वैष्णवांचा जनसागर पाहायला मिळतोय. आषाढी एकादशीला ज्या भक्तांना पंढरपूरला जाता आलं नाही. ते आपल्या गावातील किंवा शहरातील विठुरायाचा मंदिरात दर्शनासाठी जातात. 

राज्यात सर्वत्र वरुणराजे हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पावसामुळे जर तुम्ही मंदिरात जाऊ शकलात नाही तर घरच्या घरी आषाढी एकादशीची पूजा कशी करायची ते आज आम्ही सांगणार आहोत. (Ashadhi Ekadashi  Vitthal Rukmini Mandir ekadashi pooja at home Puja marathi mantra video )

सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी...!

आषाढी एकादशीला संपूर्ण दिवस उपवास केला जातो. या उपवासात तुम्ही उपवासाचे पदार्थ किंवा फळं खाऊ शकतात. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करुन घरातील मंदिरात असलेल्या देवाची पूजा करा. जर तुमच्याकडे विठुरायाची मूर्ती असेल तर तुम्ही पंचामृताने मूर्तीला स्नान घाला. त्यानंतर मूर्ती व्यवस्थित पुसून अष्टगंध आणि बुक्का लावा. आता मूर्तीला नवीन वस्त्र परिधान करा. तु

आजच्या दिवशी हा संपूर्ण उपवास करायचा असतो. उपवासाचे पदार्थ किंवा फळं खायला काही हरकत नाही. स्नान आदी आटोपून घरच्या देवाची पूजा करावी. घरी विठूरायाची मूर्ती असल्यास तिला पंचामृताने स्नान घालावे. मूर्ती व्यवस्थित पुसून तिला अष्टगंध आणि बुक्का लावावा. त्यानंतर तुळशी हार किंवा फुलांचा हार घाला. त्यानंतर नैवेद्य दाखवून विठुरायाची आरती करा. 

विठुरायाला तुळस खूप प्रिय असते म्हणून आषाढी एकादशीला तुळस तोडू नका. हार आणि पूजेसाठी लागणारी तुळस आदल्या दिवशी तोडून ठेवा. 

 

हेसुद्धा वाचा - Ashadhi Ekadashi 2023 : भेटी लागी जीवा..! आषाढी एकादशी मुहूर्त, तिथी आणि महत्त्व जाणून घ्या

 

आषाढी एकादशीचा उपवास सोडण्याच्या वेळी खालील दिलेल्या मंत्राच पठण करा. 

आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू चार महिने निद्रेत जातात अशावेळी पृथ्वीचा भार हा भगवान शंकरावर असतो. पुढील चार महिने शंकर भगवान सृष्टीची काळजी घेतो असं आख्यायिका आहे. म्हणून आषाढी संपली की श्रावण महिना सुरु होते. यंदा अधिमास आल्यामुळे श्रावण दोन महिने आहे.