राशीभविष्य : आजचा दिवस कसा जाईल?

२९ एप्रिल २०२० : आजचा दिवस कसा जाईल?

Updated: Apr 29, 2020, 10:12 AM IST
राशीभविष्य : आजचा दिवस कसा जाईल? title=

मेष - आज घराबाहेर पडू नका. थोडा आराम करा. कुटुंबीयांना वेळ द्या.

वृषभ - आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा. अन्यथा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. घरगुती कामात अधिक वेळ जाईल. 

मिथुन -  प्रत्येक गोष्टीचा आनंद घेण्यात आपले मन रमेल. नवीन मित्रांच्या संपर्कात याल. त्यामुळे आपला आनंद द्विगुणीत होईल.

कर्क - सर्वांशी प्रेमाणे वागाल.  तुमच्या स्वभावावर अनेक लोक खुश होतील. मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. 

सिंह - दिवस आपल्या मर्जीप्रमाणे जाईल. चार चौघांत तुमच्या शब्दाला मान मिळेल. आर्थिक मिळकत सुधारेल. मनाची चंचलता जाणवेल. जोडीदाराचे मत ग्राह्य मानावे लागेल.
कन्या - सध्या व्यवसायात मंदी आहे. मात्र, भविष्यात व्यवसायात वाढ करता येईल. व्यापार्‍यांना चांगला आर्थिक लाभ होईल.  

तूळ -जोडीदाराशी जुळवून घ्यावे लागेल. नातेवाईकांचा गैरसमज दूर करावा लागेल. घरगुती प्रश्न चर्चेने हाताळा.  

वृश्चिक - तब्बेतीची काळजी घ्या. खाण्या पिण्याचे पथ्य पाळावे.  मनातील इच्छा पूर्ण होईल.

धनू - बोलताना सारासार विचार करावा. वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खर्च करावा.  मुलांची काळजी लागून राहील. स्त्रियांनी आरोग्याची काळजी घ्यावी.  

मकर -  प्रतिकूलतेतून मार्ग काढण्याच प्रयत्न कराल. वाहन चालवताना काळजी घ्यावी.  कामाच्या ठिकाणी अनपेक्षित बदल दिसून येतील. 

कुंभ - दूरच्या प्रवासाचे योग येतील. आपलेच म्हणणे खरे कराल.  एकांगी विचार करु नका. त्यातून तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

मीन - कलेसाठी मोठा वाव आहे. सध्या कोरोना असल्याने घरीच कला साधना करण्यावर भर द्या.