या तारखेला जन्माला आलेली मुलं अभ्यासात असतात भरपूर हूशार....

अंकशास्त्रानुसार आपली जन्मतारीख ही आपल्यासाठी किती लाभदायक आहे याबद्दल जाणून घेण्यासाठी सर्वच जण उत्सुक असतात. जोतिषशास्त्र, नवग्रह शास्त्र यांनुसार जश्या भविष्यवाण्या केल्या जातात 

Updated: Dec 4, 2023, 06:28 PM IST
या तारखेला जन्माला आलेली मुलं अभ्यासात असतात भरपूर हूशार.... title=

तसंच अंकशास्त्रात मूल्यांकाच्या आधारे एखाद्या व्यक्तीचे गुण-दोष किंवा त्याची शिक्षण क्षेत्रातील प्रगती याबद्दल जाणून घेऊ शकतो.

प्रत्येक आई-वडिलांना वाटत असतं की आपल्या मूलाने  शिक्षणात भरपूर प्रगती करावी.ज्या क्षेत्रात काम करत असेल तिकडे त्याला धन,दौलत मिळावं. 

मुल्यांक 1 चे महत्व..
जोतिषशास्त्रामध्ये 1 हा अंक खुप महत्वाचा मानला जातो. या अंकानुसार व्यक्तिचा स्वभाव समजू शकतो, त्याच बरोबर आपल्या मुलांच्या भविष्याचे आकलण करु शकतो. जाणुन घेऊया अंकशास्त्रानुसार मुल्यांक 1 चे महत्व.

'मुल्यांक 1'  असलेल्या व्यक्तींचा स्वामी सूर्य आहे त्यामुळे या व्यक्तींमध्ये सुर्यासारखं तेज असतं, आपलं ध्येय साध्य करण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतात. धाडस आणि साहस हे दोन्ही गुण यांच्यामध्ये असतात. 

मुल्यांक 1 कसा ओळखाल... 
जन्मतारीख 1,10,19 किंवा 28 असेल तर तुमचा मुल्यांक हा 1 असेल. या तारखेला तुम्ही कोणतेही शुभ काम करु शकता, या दिवशी काम केल्यानं तुम्हाला फायदा होण्याची शक्यता असते. 

मुल्यांक 1 असलेल्या व्यक्तिंनी हे उपाय नक्की करा...

1) मुल्यांक 1 असलेली मुलं अभ्यासात खुप हुशार असतात. मुलांच्या जेवणामध्ये गुळाचा समावेश करु शकता. यामुळे त्यांचे ग्रह मजबूत होतात. 

2) सुर्य हा मुल्यांक 1 असलेल्या व्यक्तिंचा स्वामी असल्यामुळे पिवळ्या रंगाचे कपडे खरेदी करु शकता. 

3) दररोज सकाळी सुर्याला जल अर्पण केल्यानं आपल्या कुंडलीतील सुर्य मजबूत होऊ शकतो. 

4) घरातील पुर्व दिशा नेहमी स्वच्छ ठेवली पाहिजे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)