ब्लड ग्रुपवरुन जाणून घ्या स्वभावाचे गुपीत

तुम्हाला तुमचं ब्लड ग्रुप माहिती आहे का? जर नाही तर आजच चेक करा. कारण, ब्लड ग्रुप तुमची तब्येत आणि तुमचा स्वभाव यांची माहिती देण्यास मदत करतो.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 24, 2017, 02:04 PM IST
ब्लड ग्रुपवरुन जाणून घ्या स्वभावाचे गुपीत title=

मुंबई : तुम्हाला तुमचं ब्लड ग्रुप माहिती आहे का? जर नाही तर आजच चेक करा. कारण, ब्लड ग्रुप तुमची तब्येत आणि तुमचा स्वभाव यांची माहिती देण्यास मदत करतो.

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल 

धक्का बसला ना? पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, तुमच्या ब्लड ग्रुपच्या आधारे तुमची आवड-निवड, स्वभाव, काम, आयुष्याशी संबंधीत माहिती कळते.

प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, व्यवहार करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. अगदी त्याच प्रमाणे ब्लड ग्रुपचंही आहे.

इतकचं नाही तर अनेक ठिकाणी मुलाचा आणि मुलीचा ब्लड ग्रुप तपासुनच त्यांचा जीवनसाथी निवडला जातो. कुठल्याही व्यक्तीचा स्वभाव हा त्याच्या ब्लड ग्रुपवरुन ओळखला जातो असे अनेक देशातील नागरिक मानतात.

जाणून घेऊयात तुमचा ब्लड ग्रुप तुमच्याबाबत काय सांगतो...

A ब्लड ग्रुप:

A ब्लड ग्रुप असलेल्या नागरिकांत चांगली नेतृत्वक्षमता असते. कारण, त्यांच्यात यश मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची क्षमता आणि आत्मविश्वास असतो. या ब्लड ग्रुपची व्यक्ती इतरांनाही आपल्यासोबत घेऊन यश मिळवते.

A ब्लड ग्रुप असलेले व्यक्ती जबाबदार, संवेदनशील, काळजी करणारे आणि आयुष्यात चांगले मित्र बनू शकतात. ए ब्लड ग्रुप असलेली व्यक्ती इतरांबाबत खूप विचार करातात.

B ब्लड ग्रुप:

B ब्लड ग्रुप असलेली व्यक्ती इतरांसोबत पटकन मिसळतात. म्हणजेच ही लोक खूपच फ्रेण्डली असतात. या व्यक्ती थोड्या स्वार्थीही असतात. तसेच अशा व्यक्तींचा दृष्टिकोन नकारात्‍मक असतो.

B ब्लड ग्रुप असलेले व्यक्ती खूप मेहनती असतात. आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आपल्या मेहनतीच्या जोरावर मिळवण्यावर त्यांचा विश्वास असतो.

AB ब्लड ग्रुप:

एबी ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्ती शांत स्वभावाच्या असतात. तसेच खूपच स्मार्ट आणि हूशारही असतात.

या व्यक्ती कधी काय विचार करतील याचा अंदाज लावणेही कठीण असतं. ही लोकं खूपच चांगले आणि खरे मित्र बनतात.

O ब्लड ग्रुप:

O ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्ती खूपच सकारात्मक आणि विश्वासू असतात. यांच्यात एक चांगला लीडर बनण्याची क्षमता असते. मेहनत करुन चांगलं यश मिळविण्याची इच्छा यांच्यात असते.