अभिनेत्री राधा सागरने 'या' योद्धाच्या नावावरुन दिलंय मुलाला नाव, आणखी नावांची यादी पाहा

Radha Sagar Baby Boy Name : 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री राधा सागरने जाहीर केलं बाळाचं नाव. योद्धाच्या नावावरुन दिलं दोन अक्षरी नाव. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 3, 2023, 09:05 AM IST
अभिनेत्री राधा सागरने 'या' योद्धाच्या नावावरुन दिलंय मुलाला नाव, आणखी नावांची यादी पाहा  title=

Baby Boy Names Inspired By Mahabharat Warrior :  "आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री खऱ्या आयुष्यातही आई झाली आहे. लोकप्रिय अभिनेत्री राधा सागरने अखेर बाळाचं नाव जाहीर केलं. 10 सप्टेंबर 2023 रोजी राधाने गोंडस बाळाला जन्म दिला. एवढंच नव्हे तर तिने बाळाला दिलेलं नाव अतिशय गोड असून महाभारतातील योद्धांच्या नावावरुन हे नाव देण्यात आलं आहे. 

राधा सागरने अतिशय पांरपरिक पद्धतीने हा नामकरण सोहळा संपन्न केला. बाळाचे सगळे लाड करत नाव जाहीर करण्यात आलं होतं. या सोहळ्यात राधा आणि बाळाने ट्विनिंग केलं होतं. 

राधाच्या मुलाचे नाव 

राधा सागरने मुलाचं नाव 'वीर' (Veer) असं ठेवलं आहे. वीर हे दोन अक्षरी अतिशय खास नाव आहे. या नावाचा अर्थ योद्धा असं असून शूर, योद्धा, बलवान, वीज, गडगडाट, जो शूर आहे. भगवान महावीर यांचे दुसरे नाव असा देखील याचा अर्थ आहे. 

राधा सागरच्या मुलाच्या बारशाचे खास क्षण

कर्ण 
कर्ण हे देखील दोन अक्षरी अतिशय खास नाव आहे. कुंतीचा पुत्र असूनही त्याचे पालन राधा नामक महिलेने केले होते. त्यामुळे राधापुत्र कर्ण अशीही त्याची ओळख होती. मराठीमध्ये तुम्ही कर्ण या नावाचा नक्कीच विचार करु शकता. 

विदुर 
विदुर म्हणजे समजदार व्यक्तीमत्त्व, हुशार असा त्याचा अर्थ होतो. तुम्हीही वेगळ्या नावाच्या शोधात असाल तर विदुर नावाचा विचार नक्की करा. कौरवांचे प्रशासक आणि प्रधानमंत्री असणाऱ्या विदुराचे नावही वेगळे आहे. 

पार्थ 
पार्थ हे देखील अर्जुनाच्या नावांपैकी एक नाव आहे. दोन अक्षरी या नावाचा नक्की विचार करा. अर्जुनाच्या आईचे दुसरे नाव प्रीथा असल्याने त्याला पार्थ असे नाव पडले. भगवान श्रीकृष्ण नेहमीच अर्जुनाला पार्थ या नावाचे हाक मारत असत असा उल्लेख महाभारतात आहे.

कौतेय 
महाभारतातील सर्वात पराक्रमी योद्धा म्हणून अर्जुन याची ओळख आहे. अर्जुनाला कुंती पुत्र असल्यामुळे कौन्तेय नावानेही ओळखले जात होते. त्यामुळे वेगळे नाव हवे असेल तर कौन्तेय या नावाची तुम्ही निवड करू शकता. माता कुंतीच्या नावामुळे अर्जुनाचे दुसरे नाव कौंतेय असे उच्चारले जाते.

चित्राक्ष
कौरवांपैकी एक भाऊ. दुर्योधनाच्या ९९ भावांपैकी एका कौरवाचे नाव. महाभारतातील युद्धात धारातिर्थी पडलेला. एक वेगळे नाव म्हणून याचा उपयोग करून घेऊ शकता.

अर्जुन 
अर्जुन हे देखील तीन अक्षर असलेले नाव आहे. अर्जुन हा इंद्राचा मुलगा असल्याने त्याला फाल्गुन असेही म्हटले जाते. इंद्राच्या नावाचा अर्थ फाल्गुन असाही होतो. फाल्गुन हा मराठी महिनादेखील आहे. तुम्हाला वेगळे नाव ठेवायची इच्छा असेल तर तुम्ही या नावाचा विचार करू शकता. अर्जुनाच्या नावावरून प्रेरित होत या नावाचा विचार करू शकता.