मुकेश अंबानींना आदर्श मानतो रणबीर कपूर, उद्योगपतींनी दिलेला 'हा' सल्ला मनापासून पाळतो

Ranbir Kapoor : रणबीर कपूर गेल्या काही दिवसांपासून त्याच्या सिनेमांमुळे चर्चेत आहे. यशाची एवढी मोठी उंची गाठत असताना रणबीर कपूर कुणाचे सल्ले फॉलो करते, ते पाहा.   

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Feb 16, 2024, 03:18 PM IST
मुकेश अंबानींना आदर्श मानतो रणबीर कपूर, उद्योगपतींनी दिलेला 'हा' सल्ला मनापासून पाळतो title=

बलिवूड सुपरस्टार रणबीर कपूरसाठी गेलं वर्ष जबदस्त होतं. Animal सिनेमाच्या भरघोस यशानंतर रणबीर कपूर यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. आता रणबीर कपूरचा 'रामायण' या आगामी सिनेमात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन नितेश तिवारी याचं दिग्दर्शन करत आहेत. या सिनेमात रणबीर प्रभू श्री रामाची भूमिका साकारत आहेत. लोकमतच्या एका अवॉर्ड शोमध्ये रणबीरने आपल्या जीवनातील तीन आधार स्तंभ सांगितले आहेत. सोबत आपल्या जीवनात रणबीर कुणाला आदर्श मानतो ते ही सांगितलं आहे. 

अंबानींचा सल्ला

अवॉर्ड शोमध्ये रणबीर कपूरने देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना आपले प्रेरणास्थान असल्याचे सांगितले. यावेळी रणबीरने मुकेश अंबानींकडून मिळालेल्या सल्ल्याचा खुलासाही केला. रणबीरने सांगितले की, मुकेश अंबानी यांनी त्याला सांगितले होते की, 'तुझे यश किंवा अपयश कधीही तुझ्यावर हावी होऊ देऊ नकोस'. याशिवाय रणबीर पुढे म्हणाला, 'चांगले काम करणे, तसेच एक चांगला माणूस, चांगला मुलगा, चांगला भाऊ आणि चांगला मित्र असणे हा त्याच्या आयुष्याचा पहिला आधार आहे. 

काय म्हणाला रणबीर 

आपले भाषण सुरू ठेवत रणबीर कपूर पुढे म्हणाला, 'आणखी एक चांगला माणूस व्हा, एक चांगला मुलगा, एक चांगला पिता, एक चांगला नवरा, एक चांगला भाऊ, एक चांगला मित्र आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक चांगला नागरिक बना. मला खूप अभिमान आहे की मी एक मुंबईकर आहे आणि असा सन्मान माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे, खूप खूप धन्यवाद.

अंबानी कुटुंबाशी जवळचे संबंध 

मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी हा रणबीर कपूरचा जवळचा मित्र आहे. तर कपूर कुटुंब आणि अंबानी कुटुंब अनेक वर्षांपासून चांगले कौटुंबिक मित्र आहेत. अनेक कार्यक्रमात त्यांच्यातील हा जिव्हाळा अधोरेखित होतो. 

सिनेमा चर्चेत 

सध्या रणबीर कपूर त्याच्या आगामी प्रोजेक्टमुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत साऊथ अभिनेत्री साई पल्लवी दिसणार आहे. जी सीतेची भूमिका साकारणार आहे. KGF स्टार यशने या चित्रपटात रावणाची भूमिका साकारली आहे. त्याचवेळी रकुल प्रीत सिंह आणि बॉबी देओल यांचाही सहभाग असल्याच सांगितलं जात आहे. या सिनेमासाठी नुकतीच रणबीरने त्याची लूक टेस्ट दिली आहे.

दिग्दर्शक नितीश तिवारी यांनी रणबीर कपूरला वजन न वाढवण्याचा सल्ला दिला आहे. जेणेकरून तो पडद्यावर नैसर्गिकरित्या स्लिम अवतारात दिसेल. रणबीर कपूरच्या लूक टेस्टनंतर त्याचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये अभिनेत्याच्या भगवान राम लूकने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. सध्या रणबीर चित्रपटातील त्याच्या व्यक्तिरेखेसाठी तासन्तास रिहर्सल करत असल्याची चर्चा आहे.