सद्गुरुंनी सांगितलेले उत्कर्षाचे 7 'क' मुलांना 100% करतील यशस्वी

Satguru Tips On Student Success : मुलांनी जीवनात यशस्वी व्हावं, टॉपला जावं असं पालकांना वाटत असतं. (Student Success Tips) पण अशावेळी नेमकं काय करायचं? हा प्रश्न पडतो. सद्गुरु श्री वामनराव पै (Satguru Shree Wamanrao Pai) यांनी सांगितलेल्या उत्कर्षाच्या 7 पायऱ्या नक्कीच पालकांना मदत करतील. (Satguru 7 Success Tips for Student) 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 21, 2023, 09:27 AM IST
सद्गुरुंनी सांगितलेले उत्कर्षाचे 7 'क' मुलांना 100% करतील यशस्वी title=

Satguru Parenting Tips : पालकांना मुलांच यश पाहण्यातच खरा आनंद असतो. मुलांचं संगोपन करत असताना ते 100% यशस्वी कशी होणार याकडे पालकांचा कल असतो. अशावेळी तुम्ही सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या उत्कर्षाच्या 7 पायऱ्या आचरणात आणलात तर नक्की याचा फायदा होईल. 

सद्गुरु श्री वामनराव पै यांची आज जन्मशताब्दी आहे. 21 ऑक्टोबर 1923 साली सद्गुरुंचा जन्म झाला. ६० वर्षांहून अधिक काळ सद्गुरु श्री वामनराव पै यांनी समाजप्रबोधन केले, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रत्येक विद्यार्थी हा यशस्वी झाला पाहिजे आणि तो टॉपला केला पाहिजे, ही सद्गुरुंची धारणा. 

आजकालच्या पालकांना वाटतं की, आपल्या मुलांने चांगले यश संपादन करावे. करिअरमध्ये त्याने प्रगती करावी, अशावेळी सद्गुरुंनी सांगितलेल्या 7'क' नक्कीच विद्यार्थ्यांना यासाठी मदत करतील. 

मुलांनी जीवनात यश संपादन करत असताना 'उत्कर्ष' 'उन्नती' या दोन्ही स्तरावर प्रगती करणे तितकेच गरजेचे आहे, असं सद्गुरु सांगतात. अशावेळी नेमकं काय करायचं हा प्रश्न पालकांनाच पडतो, तर मग मुलांचं सोडाचं? पालकांनी मुलांना या 7 पायऱ्यांचं महत्त्व पटवून देणे तितकेच गरजेचे आहे. (वाचा - मुलांनी जीवनात 100% यशस्वी व्हावं असं वाटतंय, मग सद्गुरूंनी सांगितलेला 3R Formula फॉलो करा)

कष्ट 
मुलांना कष्टाचं महत्त्व पालकांनी समजावून सांगायला पाहिजे. हल्ली मुलांना सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध होतात. पण योग्य पद्धतीने कष्ट केल्यावर मुलांना नक्की यश मिळेल, पालकांनी यासाठी मुलांना मदत करावी. 

कर्तव्य 
पालकांनी मुलांना आपली कर्तव्य काय आहेत?याची जाणीव करून देणे गरजेचे आहे. अनेकदा मुलांना आपल्या कर्तव्याची जाणीव नसते आणि ते वाहवत जातात. 

कौशल्य 
प्रगती करण्यासाठी मुलांमध्ये कौशल्य असणे अत्यंत गरजेचे असते. आजच्या स्पर्धेचे युगात मुलांनी कौशल्याने प्रगती करायला हवी. तुम्हाला यश संपादन करून ते टिकवण्यासाठी कौशल्यच मदत करते. 

कल्पकता 
कोणतेही काम कल्पकतेने करणे गरजेचे असते. कल्पकता तुमच्या अभ्यासातील / कामातील वेगळेपण निश्चित करते. ठोकताळ्याप्रमाणे अभ्यास करण्यापेक्षा पालकांनी मुलांना यामध्ये कल्पकता आणण्यास मदत करावी.कल्पकता अभ्यासातही वापरणे तितकेच गरजेचे असते. 

कौतुक 
कौतुकाचं महत्त्व पालकांनी मुलांना आपल्यातूनच शिकवावे. कौतुक करणे तितकेच गरजेचे आहे.तसेच पालकांनी मुलांमध्ये देखील हा गुण रुजवला पाहिजे. 

करुणा 
माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं हा गुण पालकांनी मुलांमध्ये रुजवणे गरजेचा आहे. पालकांनी लहान वयातच मुलांना हे गुण शिकवावेत. 

कृतज्ञता 
यशाच्या शिखरावर पोहोचताना मुलांना कायमच कृतज्ञता हा गुण शिकवायला हवा. कारण प्रगती करत असताना कायम जमिनीवर पाय असणे अत्यंत गरजेचे आहे.