कार्डिअ‍ॅक अरेस्ट आणि हार्ट अटॅकमध्ये फरक काय? जास्त घातक कोणता? लक्षणे काय?

Cardiac Arrest vs Heart Attack Symptoms: हिंदी सिनेमा आणि मालिका सृष्टीतले लोकप्रिय अभिनेते ऋतुराज सिंह यांचं आज (20 फेब्रुवारी) कार्डियाक अरेस्टने निधन झाल्याची माहिती आहे. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कार्डियक अरेस्ट आणि हार्ट अटॅकमध्ये नेमका फरक काय? जास्त खतरनाक कोणता? जाणून घ्या सर्वकाही... 

श्वेता चव्हाण | Updated: Feb 20, 2024, 06:37 PM IST
कार्डिअ‍ॅक अरेस्ट आणि हार्ट अटॅकमध्ये फरक काय? जास्त घातक कोणता? लक्षणे काय? title=

Cardiac Arrest vs Heart Attack Symptoms: हिंदी चित्रपटसृष्टीतील आणि मलिका सृष्टीतले लोकप्रिय अभिनेते ऋतुराज सिंह यांचे आज (20 फेब्रुवारी) निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार वयाच्या 5900 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ऋतुराज सिंग यांच्या निधनाने टीव्ही निर्माते चांगलाच धक्का बसला आहे. ऋतुराज सिंह यांचे कार्डियक अरेस्टमुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कार्डियक अरेस्टमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे कार्डियक अरेस्ट नेमकं काय आहे? तसेच कार्डियक अरेस्ट आणि हार्ट अटॅकमध्ये यात नेमका फरक काय? जाणून घ्या या दोघांमधील फरक... 

हृदयविकाराचा आजार हा भारतात सामान्य आजार झाला आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जेवढे कोरोनामुळे रुग्णांचा जीव गेला नसेल तेवढा हृदयविकारामुळे लोकांचा मृत्यू झाला आहे.  यामध्ये सर्वसामान्यांपासून दिग्गजांपर्यंत सर्वांनाच हृदयविकाराच्या आजाराने गाठलेले आहे. यामध्ये क्रिकेटपटू कपिल देव आणि सौरभ गांगुली, प्रसिद्ध डान्सर रेमो डिझुझा, नृत्यदिग्दर्शक सरोज खान, अभिनेत्री श्रीदेवी, तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता अशा एकापेक्षा एक दिग्गजांना हा आजार होऊन गेला. त्यामुळे चुकूनही या आजाराला दुर्लक्षित करु नका. अनेकदा आपल्याला माहित नसते की ह्रदयक्रिया बंद पडणे, आणि ह्रदयविकाराचा झटका यात नेमका फरक काय? 

कार्डियाक अरेस्ट म्हणजे काय आणि लक्षणे? 

कार्डियाक अरेस्ट म्हणजे हृदयाचे कार्य अचानक बंद पडणे. कार्डियाक अरेस्टमध्ये रक्ताभिसरणाची प्रक्रिया म्हणजेच हृदयाचे ठोके थांबण्याची प्रक्रिया थांबते. सर्वसाधारणपणे, कार्डियाक अरेस्ट आणि कार्डियाक अटॅक हा आजार शक्यतो एकच समजला जातो. फक्त हे दोन प्रकार पूर्णपणे भिन्न आहेत. तज्ज्ञांच्या मते, कार्डिॲक अरेस्टमध्ये हृदयाचे धडधडण्याची प्रक्रिया थांबते आणि शरीराच्या अवयवांना होणारा रक्तपुरवठा अचानक थांबतो. या अवयवांमध्ये आपला मेंदूदेखील समाविष्ट असल्याने मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाहदेखील बंद होतो. 

या आजारपणात सुरुवातीला थकवा जाणवतो. हृदय वेगाने धडधडायला लागते. हृदयात वेदना होतात. चक्कर येऊ लागते. तसेच शुद्ध हरपते श्वासोच्छ्वास कमी होते. हृदयविकाराचा ज्यांना आजार आहे त्यांच्यामध्ये कार्डियाक अरेस्ट शक्यता जास्त आहे. 

हार्ट अटॅक म्हणजे काय?

आपल्या कोरोनरी धमन्यांमध्ये जास्त प्रमाणात चरबी जमा होते. ही चरबी वाढते आणि आतील बाजूच्या रक्तवाहिन्या बंद होते. या अरुंधपानमुळेच रक्तपुरवठा पुरेसा होत नाही. त्यामुळे हृदयातील कामाचा वेग हळूहळू कमी होतो. जेव्हा तुमच्या कोरोनरी धमन्यांमध्ये 60 ते 80 टक्के जास्त चरबी असते, तेव्हा तुम्हाला प्राणघातक हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. हृदयविकाराच्या झटक्याची मुख्य कारणे म्हणजे धूम्रपान, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा, तसेच कौटुंबिक हिस्टरीदेखील महत्त्वाचे कारण आहे  या आजारामध्ये असे काही लक्षणे दिसतात की, चुकीच्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचा झटका कधीही येऊ शकतो. छाती आणि पाठीच्या मधोमध दुखणे, हात सुन्न होणे, जबड्याच्या खालची बाजू, पोटाच्या भागात दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, दम लागणे, घाबरणे, छातीत दुखणे, हात-पायांमध्ये थंडी जाणवणे. , चक्कर येणे, नीट चालता न येणे अशी लक्षण दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण ही लक्षणे ह्रदयविकाराची कारणं ठरु शकते.