Baby Girls Names on Sita : सीता जयंती 16 मे रोजी साजरी केली जात आहे. या निमित्ताने आपण देवी सीतेची 10 सुंदर नावे पाहणार आहोत. ज्या नावांचा विचार तुम्ही मुलींसाठी करु शकता.
सीता नवमी दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरी केली जाते. हा दिवस सीता मातेचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला सीता जयंती असेही म्हणतात. सीता नवमीच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. पुष्य नक्षत्रात मंगळवारी देवी सीतेचा जन्म झाला.
1. सिया - शुभ्र चांदण्यासारखी सुंदर असा याचा अर्थ आहे.
2. पार्थवी - पृथ्वी मातेची मुलगी असा 'पार्थवी' या नावाचा अर्थ आहे.
3. जानकी - राजा जनकाची कन्या म्हणून 'जानकी' हे नाव लोकप्रिय आहे.
4. शिवसाथी - देवी सीतेचे समानार्थी एक सुंदर नाव 'शिवसाथी' असे आहे.
5. वाच्य - जो प्रत्येक गोष्ट खूप सुंदरपणे व्यक्त करतो. हे नाव युनिक आणि वेगळं आहे.
6. सीताशी - देवी सीतेचे समानार्थी नाव 'सीताशी'. मुलीसाठी खास नावाचा विचार करु शकता.
7. लक्षकी - एक सुंदर नाव ज्याचा अर्थ देवी सीता आहे.
8. भौमी - जो पृथ्वीपासून उत्पन्न होतो असे 'भौमी' हे नाव आहे.
9. जनकनंदिनी - राजा जनकाची प्रिय कन्या 'जनकनंदिनी'. हे नाव मोठे वाटत असेल तर 'नंदिनी' असे नाव देखील मुलीसाठी निवडू शकता.
10. मैथिली - मिथिलाची राजकन्या म्हणून सीतेला 'मैथिली' हे नाव ठेवण्यात आलंय.
11. मरुण्मयी - जी माती किंवा मातीपासून बनविली जाते. 'मृण्मयी' हे नाव ऐकले असेल पण 'मरुण्मयी' या नावाचा विचार करायला काहीच हरकत नाही.
12. वैदे - देवी सीतेचे आणखी एक सुंदर नाव 'वैदे' असे आहे.
13. सिया - जो आनंद आणतो. सिया हे नाव अतिशय युनिक आणि दोन अक्षरी आहे.
14. रामेती - जो नेहमी भगवान रामाचे स्मरण करतो. 'रामेती' हे नाव देखील वेगळं आहे.
15. अवनिजा - जो पृथ्वी मातेशी संबंधित आहे. 'अवनिजा' हे नाव खूप युनिक आणि वेगळं आहे.