महत्त्वाच्या कामासाठी जाताना दही - साखर का खातात? यामागे आहे धार्मिक आणि वैज्ञानिक कारणं

परीक्षा असो किंवा ऑफिसमध्ये नवीन काम असो घरातून बाहेर पडता आई आपल्याला दही साखर देते. हिंदू धर्मात ही प्रथा आजही पाळली जाते. पण या मागील धार्मिक आणि शास्त्रीय कारणं तुम्हाला माहितीय का?

नेहा चौधरी | Updated: May 14, 2024, 10:04 AM IST
महत्त्वाच्या कामासाठी जाताना दही - साखर का खातात? यामागे आहे धार्मिक आणि वैज्ञानिक कारणं title=
Why do you eat curd sugar while going for important work There are religious and scientific reasons behind this

हिंदू धर्मात शतकानुशतके अनेक प्रथा आणि परंपरा पाळल्या जातात. त्या परंपरेमागील अनेक वेळा कारणंही लोकांना माहिती नसतात. पण पूर्वार चाल आलेली प्रथा आहे म्हणून ती पाळली जाते. अशी एक प्रथा आहे, ज्यामध्ये शुभ कार्य असो, परीक्षा, नोकरीसाठी मुलाखत काहीही असो आई किंवा आजी त्या व्यक्तीला घरातून बाहेर पडण्यापूर्वी दही साखर देते. यामागे अशी मान्यता आहे की, दही साखर खाल्ल्यास ते काम चांगल होतं. पण तुम्हाला या मागील धार्मिक आणि शास्त्रीय कारणं माहितीय? (Why do you eat curd sugar while going for important work There are religious and scientific reasons behind this)

शुभ कार्यासाठी जाताना दही - साखर का खातात? 

आयुर्वेदात दह्याला अतिशय महत्त्व आहे. दही हे आपल्या शरीराला थंड ठेवतं. दह्याचं सेवन हे आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार दहीचा संबंध हा चंद्राशी आहे. त्यामुळे महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताना दही खाल्ल्यास तुमचा आत्मविश्वास मजबूत होतो, अशी मान्यता आहे. त्याशिवाय दही साखर घालल्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो. 

हेसुद्धा वाचा - White Blister Risk : वारंवार तोंडाला फोड येणं हे गंभीर आजाराचं लक्षण, 'या' कारणांमुळे येतं तोंड

काय आहे शास्त्रीय कारणं?

हे झालं धार्मिक कारण, आता जाणून घेऊयात या प्रथेमागील शास्त्रीय कारण काय आहे. तर दही हे थंड असतं, शिवाय ते अन्न पचवण्यास मदत करतं. दह्यातील कॅल्शियम, व्हिटामिन बी 2, बी 12, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करतात. तर साखरेत कार्ब्स असतात जे रक्तातील साखरेची पातळी मजबूत करतात आणि मेंधूला रक्ताभिसरण करुन स्मरणशक्ती वाढवतात. 

हेसुद्धा वाचा - Sambhaji Maharaj Jayanti 2024 : छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती, 'या' खास शुभेच्छा शेअर करत शंभूराजांना करा मानाचा मजुरा

त्यामुळे जेव्हा आपण महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जातो. परीक्षा, मुलाखत किंवा अजून महत्त्वाचं काम तर आपण आधीच तणावग्रस्त असतो. अशावेळी दही सारखचं सेवन केल्यास शरीराला थंडाव्यासह मेंदूला चालना आणि शरीराला ऊर्जा मिळते. मग तुम्ही शांत मनाने तुमचं काम करु शकता. आता शास्त्रीय कारण कळल्यानंतर तुम्हीही आईला काय हे दही सारख देते असं न म्हणतात आवडीने ते खाणार ना.