हिवाळ्यात बाजरीचे सेवन करणं फायदेकारक का? जाणून तुम्हीही कराल रोजच्या आहारात समावेश

Why millet Bajra is good in winter : अनेकांना बाजरी आवडत नाही त्यामुळे बाजरीचे सेवन का करायला हवं. असा प्रश्न तुम्हालाही असेल तर ही बातमी वाचल्यावर नक्कीच कराल आहारात सामवेश.

दिक्षा पाटील | Updated: Nov 23, 2023, 06:02 PM IST
हिवाळ्यात बाजरीचे सेवन करणं फायदेकारक का? जाणून तुम्हीही कराल रोजच्या आहारात समावेश title=
(Photo Credit : Social Media)

Why millet Bajra is good in winter : थंडीचा महिना सुरु झाला असून आपली सरकार देखील मिलेट्स म्हणजे कडधान्य आणि त्यातल्या त्यात बाजरीला प्रमोट करत आहे. मात्र, हे देखील खरं आहे की बाजरीचे हिवाळ्यात सेवन करण्याचे खूप चांगले फायदे आहेत. बाजरीपासून बनवण्यात आलेले पदार्थ हे चवीला देखील तितकेच चवीष्ट असतात. आज आपण बाजरीचे फायदे जाणून घेणार आहोत. 

आतड्यांना देतात ताकद
बाजरी खाल्यानं तुमच्या आतड्यांना ताकद मिळते. कारण बाजरीत फायबर मोठ्या प्रमाणात असतात. जे आपल्या आतड्यांसाठी प्री-बायोटिक म्हणून काम करतात. आपल्या आतड्यांमध्ये काहीही न अडकता आपल्या बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून दूर ठेवण्यासाठी फायबर महत्त्वाचे असते. अशात आपण बाजरीपासून बनवलेले पदार्थ खाल्यास आपली पचन शक्ती वाढते. 

वजन कमी करण्यास मदत
बाजरीचे पदार्थ खाल्यानं तुमचं वजन कमी होण्यास नक्कीच मदत होते. त्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स असतात. बाजरीची पचनक्रीय हळू-हळू होते त्यामुळे आपल्याला लवकर भूक लागत नाही. त्यामुळे बाजरी पासून बनवण्यात आलेले पदार्थांचे सेवन केल्यास आपल्याला लवकर भूक लागत नाही. अशात आपलं वजन कमी होतं. 

शरीरातील साखर संतुलीत राहते
आपल्या रोजच्या आहारात आपण जे काही खातो त्याचे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यातील एक महत्त्वाची गोष्ट फायबर असते. फायबर योग्य प्रमाणात मिळाले तर मधुमेह म्हणजेच रक्तातील सारखर नियंत्रणात राहते. बाजरीत फायबर खूप असते आणि त्यात पचण्यायोग्य स्टार्च असल्यानं मधुमेह नियंत्रणात राहते. 

हेही वाचा : जीम न करता 58 व्या वर्षी कसा फीट राहतो मिलिंद सोमन!

हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी 

बाजरीत असलेले मॅग्नेशियमचा आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. त्यामुळे ज्यांना हृदयाच्या समस्या आहेत त्यांनी त्यांच्या आहारात बाजरीचा समावेश करायला हवा. मॅग्नेशियम बीपी आणि मधुमेह त्यासोबत हृदयविकाराच्या इतर समस्यांपासून दूर ठेवतो. इतकंच नाही तर त्यामुळे कोलेस्ट्रॉल देखील कमी होतो. याशिवाय स्ट्रोक होण्याची शक्यता देखील कमी होते. 
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)