तरुणांची / पुरुषांची कोणती गोष्ट महिलांना सर्वात जास्त आकर्षित करते?

Relationship Tips : प्रत्येक महिलेने आपला जोडीदाराविषयीची कल्पना रेखाटलेली असते. आपला जोडीदार हा स्मार्ट आणि हुशार असावा असं प्रत्येक महिलेला वाटतं. महिलांना कसा पुरुष आवडतो यावर अनेक वेळा चर्चा होते. 

नेहा चौधरी | Updated: Oct 11, 2023, 01:09 PM IST
तरुणांची / पुरुषांची कोणती गोष्ट महिलांना सर्वात जास्त आकर्षित करते? title=
women find most attractive about men know in detail

Relationship Tips : स्त्री असो पुरुष आपल्या आयुष्याचा जोडीदार कसा असावा याबद्दल प्रत्येकाची आपली अशी कल्पना असते. प्रत्येक तरुणीला किंवा महिलेला आपल्या जोडीदारामधील वेगवेगळ्या गोष्टी आवडतात. मुळात तरुणाने आपल्याला राणी सारखं ठेवावं, त्याने आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण कराव्यात, अशी अपेक्षा साधारण तरुणींची असते. एखाद्या तरुणाशी किंवा पुरुषाशी ओळख झाली की त्याच्याबद्दलचे गुणधर्म आणि स्वभाव समजतो. पण पहिल्या नजरेत महिलांना किंवा तरुणींना तरुणांची / पुरुषांची कोणती गोष्ट जास्त आकर्षित करतात याबद्दल आज आम्ही हे गुपित सांगणार आहोत. (women find most attractive about men know in detail)

डॅशिंग पर्सनालिटी

तरुणींना किंवा महिलांना आपला जोडीदारा हा फक्त हँडसम नाही तर डॅशिंग पर्सनालिटीचा आवडतो. त्याचा स्वभाव हा सगळ्यांना भुरळ पाडेल असा असावा असं वाटतं. अगदी प्रेमळ स्वभाव आणि पहिल्या नजरेत घायाळ करले अशी डेशिंग पर्सनालिटी असलेला आवडतो. तो प्रामाणिक असावा आणि तेवढ्याच तो मेहनती असावा. संकटातही डोंगरासारखा खंबीरपणे लढणारा असावा. 

भावनिक स्वभावाचा

आजकालचे तरुण हे प्रॅटिकल असतात. ते प्रत्येक गोष्टीत व्यवहार आणि नफा तोटा बघून आयुष्यातील गोष्टी करत असतात. पण पुरुषांनो महिलांना तुमच्यामधील भावनिक आणि संवेदनशील स्वभाव आकर्षिक करतो. पुरुषांनी आपल्याला समजून घेतलं पाहिजे असं वाटतं. त्यांनी अनेक बाबातीत भाविनक झालेलं महिलांना आवडतं. छोट्या छोट्या गोष्टीत तुम्ही त्यांची भावनिकदृष्टीने काळजी घेतलेली त्यांना खूप आवडतं. 

तिला जपणारा 'तो' 

तरुणी किंवा महिला आपल्या जोडीदारात वडिलांची सावली शोधत असतात. म्हणजे एक प्रकारे त्या काळजी आणि प्रेम या दोघांचा सुंदर मेळ घालणारा जोडीदार बघत असतात. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये काळजी घेणारा तो जपणारा तो महिलेला खूप जास्त आवडतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिला सगळं सांगणारा आणि तिची स्तुती करणारा तो तिच्या मनात कायम घर करुन राहतो. 

आवाजातील ती जादू 

महिलांना कणखर आवाजाचा पुरुष अधिक मंत्रमुग्ध करतो. शांत स्वभावासोबत कणखर आवाज असलेला पुरुष महिलांना वेड लावतात. अशी व्यक्ती हे महिलांचा आदर करतात असं म्हटलं जातं.

आयुष्य जगणारे तरुण 

कटकट करणारे आणि चिडचिड करणारे पुरुष महिलांना अजिबात आवडतं नाही. दिलखुलास आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण जगणारे पुरुष महिलांना सर्वाधिक आवडतात. कायम फ्रेश आणि आनंदी असणारे तरुण त्यांनाही आयुष्यात सकारात्मक ऊर्जा देतात. त्यामुळे अशी व्यक्ती आजूबाजूला असल्यास जगं अतिशय सुंदर होतं. 

रोमँटिक स्टाइल 

जोडप्यामधील रोमान्स हा आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. महिलांना रोमँटिक आणि सप्रराईज देणारा पुरुष सर्वाधिक पसंत असतो. फक्त प्रेम करतो असं म्हणून होतं नाही. तर त्या प्रेमाला व्यक्त करणारा पुरुष हा सर्वाधिक आकर्षित असतो. त्यामुळे तरुणांना गिफ्ट देणारा, फिरायला घेऊन जाणारा, छोट्या छोट्या गोष्टीतून प्रेम व्यक्त करणारा तरुण पटकन तरुणींना आकर्षित करु शकतो. 

स्वत:ची काळजी घेणारा तो 

हो, अगदी बरोबर...आजकालच्या तरुणींना स्वत:ची काळजी घेणारा तरुण अधिक आवडतो. फिटनेससोबत स्वत:च्या व्यक्तित्व प्रगतीसाठी काळजी घेणारा तरुण तरुणींना लगेचच मोहात पाडतो. 

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)