LIVE उत्तरप्रदेश निवडणूक 2017 निकाल
11 Mar 2017, 12:31 वाजता
उत्तरप्रदेशात भाजपचे प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य यांची विजयी रॅली
WATCH: BJP UP state president Keshav Prasad Maurya celebrates in Lucknow as BJP leading in Uttar Pradesh pic.twitter.com/PkH2RNMAqm
— ANI UP (@ANINewsUP) March 11, 2017
11 Mar 2017, 11:33 वाजता
मतदारांनी दिलेल्या कौलाचा आम्ही मान राखतो... पण, यातून विकास हरला आणि व्होटबँकेचं राजकारण जिंकलं असंच दिसतंय - राजीव शुक्ला, काँग्रेस
11 Mar 2017, 11:06 वाजता
मुबारकपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री अखिलेश यादव पिछाडीवर... बसपाचे शाह आलम आघाडीवर
11 Mar 2017, 10:35 वाजता
भाजप 304, सपा-काँग्रेस 70, बहुजन समाज पक्ष 19 तर इतर 10 जागांवर आघाडीवर
11 Mar 2017, 10:34 वाजता
मुख्यमंत्री पदासाठी केंद्रीय मंत्री उमा भारती, प्रदेशाध्यक्ष केशवप्रसाद मौर्य, केंद्रीय आरोग्य मंत्री महेश शर्मा यांच्या नावाची चर्चा
11 Mar 2017, 10:30 वाजता
उत्तरप्रदेशात मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात...?
11 Mar 2017, 10:26 वाजता
नागरिकांनी सपा-काँग्रेसची युती धुडकावून लावली, विकासाला मिळाली मतं - योगी आदित्यनाथ, भाजप
11 Mar 2017, 10:22 वाजता
कामाच्या आधारावर मतं मिळाली... महिला आणि युवकांचा प्रतिसाद - प्रकाश जावडेकर, भाजप
11 Mar 2017, 10:15 वाजता
भाजपनं गाठला 292 चा आकडा... आत्तापर्यंतचं भाजपचं सर्वात मोठं यश... 1991 मध्ये भाजपला मिळाल्या होत्या 221 जागा
11 Mar 2017, 10:00 वाजता
किसी की जित पे मातंग मनाने से क्या फायदा... अपनी हार का सबब तो पुछों - भाजप नेते माधव भंडारींचा विरोधकांना टोला