Maratha Morcha LIVE News Updates : मराठा क्रांती मोर्चा क्षणाक्षणाचे अपडेट्स

Last Updated: Thursday, August 17, 2017 - 17:23
Maratha Morcha LIVE News Updates : मराठा क्रांती मोर्चा क्षणाक्षणाचे अपडेट्स
Zee Media Bureau

मराठा आरक्षणासाठी मुंबईत आज ९ ऑगस्टला भव्य मराठा मोर्चा काढण्यात येत आहे.

Latest Updates

17:23 PM
14:44 PM

मुंबई : आरक्षण नसल्याने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता असूनही प्रवेश मिळत नाही : तरुणींनी आझाद मैदानात मांडली व्यथा, मराठा समाजाला आरक्षण देता की जाता, तरुणींचा सरकारला निर्वाणीचा इशारा, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, मराठा समाजातील तरुणींची मागणी

12:00 PM

मुंबई  : राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांचे शिवसेनेला आवाहन, सत्ताधारी पक्षाचे आमदार ओरडत आहे मराठा आरक्षण द्या, वकील चुकीचे लावले, सत्ताधारी सगळ्यांना आवाहन, एक ओळीचा ठराव आणावा, आम्ही एकत्रित ठरावला पाठिंबा देऊ

12:00 PM

मुंबई  : मराठा क्रांती मोर्चासाठी हजारो लोक मुंबईत दाखल झाले आहेत. त्याकरिता महाराष्ट्राच्या काना-कोप-यातून मराठा बांधव मुंबईत वाहनाने आलेत. मराठा क्रांती मूक मोर्चामध्ये रणरागिणी मोठ्या उत्साहात सहभागी झाल्या आहेत. तसेच मराठा मोर्चात लहान मुलांचाही मोठा सहभाग पाहायला मिळतोय.  

10:45 AM

मुंबई : भायकळा येथून मराठा क्रांती मोर्चाला शांततेत सुरुवात, मोर्चाला प्रचंड गर्दी, मोर्चेकरांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. हातात भगवे झेंडे घेऊन लोक हजारोंच्या संख्येने सहभागी

10:43 AM

मुंबई : मराठा मोर्चाला अर्धा तास उरला असताना प्रचंड गर्दी वाढत आहे. भायकळा येथून हा मोर्चा आझाद मैदान इथे पोहोचल्यानंतर सरकारशी समिती चर्चा करणार, मराठा मोर्चाची २४ सदस्यांची समिती सरकारसोबत मागण्यांसंदर्भात चर्चा करणार आहे. दरम्यान, शिवसेनेचा मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा दिलाय. तर सोशल मीडियावरही मोर्चाची धूम दिसत आहे. मराठा क्रांती मोर्चा ट्विटरवरही ट्रेंडींगमध्ये आला, मुंबईच्या ट्रेंडमध्ये मोर्चाने दुसरा नंबर मिळवलाय.

10:09 AM

-  मराठा क्रांती मोर्चामुळे आनंदनगर चेक नाक्यावरील टोलवसुली आज थांबवण्यात आली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी टोलवसुली थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

09:53 AM

मुंबई : मराठा मोर्चासाठी येणाऱ्या वाहानांची संख्या क्षणोक्षणी वाढतेय आणि त्याचा परिणाम आता मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या वाहतूकीवर होऊ लागला आहे. पूर्व द्रूतगती मार्गावर मुंबईचं प्रवेशद्वार असणाऱ्या ठाण्याच्या आनंदनगर चेक नाक्यावर भल्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.

09:38 AM

- मुंबईतील मराठा क्रांती मोर्चात सहभागी होण्यासाठी मराठा बांधव पश्चिम महाराष्ट्रातून मुंबईकडे रवाना झालेत. यामुळे पहाटेपासूनच मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर गर्दी पाहायला मिळतेय. खालापूर टोलनाक्यावर मोर्चेकरांसाठी चहा आणि पाण्याची मोफत व्यवस्था करण्यात आलीय. मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर टोलनाक्यांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. 

09:37 AM

 - मुंबईतील भायखळ्यात जिजामाता उद्यानापासून मोर्चाला सुरुवात होणार आहे, आता सकाळपासूनच मोर्चास्थळी गर्दी होतेय. काही जण कोल्हापूरापासून सायकलवर मोर्चासाठी आलेत. 

#एक_मराठा_लाख_मराठा,  मराठा मोर्चा, मुंबई, मराठा रॅली, मराठा आरक्षण 

First Published: Thursday, August 17, 2017 - 17:23


comments powered by Disqus