Live Nanded municipal election results : नांदेड महापालिका निवडणूक निकाल

Live Nanded municipal election results : नांदेड महापालिका निवडणूक निकाल

 नांदेड महापालिका निवडणूक २०१७ निकाल

12 Oct 2017, 15:09 वाजता

- काँग्रेसचा ५० जागांवर विजय तर १५ जगांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत, भाजपने केवळ ३ जागांवर विजय मिळवलाय तर शिवसेनेला १ जागेवर समाधान मानावे लागेलय

12 Oct 2017, 13:49 वाजता

-  काँग्रेसचा ४३ जागांवर विजय तर १३ जागांवर आघाडी, महापालिकेत काँग्रेसने गाठला बहुमताचा आकडा, भाजपाकडे दोन तर शिवसेनेला मिळाली एक जागा 

12 Oct 2017, 13:43 वाजता

- नांदेड महापालिका निवडणुकीत शिवसेनेने खाते उघडले, शिवसेनेचे तरोडा खु.मधून बालाजी कल्याणकर विजयी

12 Oct 2017, 12:27 वाजता

नांदेड : एम आय एम चे प्रदेश अध्यक्ष सय्यद मोईन यांची आई होळी प्रभाग 14 मधून पराभूत, जकीया बेगम याना काँग्रेसच्या उमेदवार शबाना बेगम यांनी हरवले २५० मतांनी

12 Oct 2017, 12:08 वाजता

- काँग्रेस १५ जागांवर विजयी, तर भाजपच्या उमेदवार शांता गोरे कौठा प्रभागातून विजय, भाजपने खाते खोलले,

12 Oct 2017, 11:59 वाजता

- नांदेड महापालिका निवडणुकीत भाजपला अजुनही खाते खोलता आलेले नाही,  शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची तिच स्थिती, काँग्रेसने मारली बाजी

12 Oct 2017, 11:56 वाजता

– काँग्रेस २५ तर भाजप ३ जागांवर आघाडीवर तर  प्रभाग ११ मधून काँग्रेसच्या आशिया बेगम अब्दुल हबीब विजयी

12 Oct 2017, 11:29 वाजता

 - हैदरबाग प्रभागातून काँग्रेसच्या शेर अली यांचा विजय तर  प्रभाग क्रमांक ११ हैदरबागमधून कॉंग्रेसकडे ४ जागा कायम

12 Oct 2017, 11:18 वाजता

- पालिका निवडणुकीत भाजपचा सुफडा साफ 
कॉंग्रेस - 20
भाजप - 01
शिवसेना - 01
राष्ट्रवादी - 00
एम आय एम - 00

12 Oct 2017, 11:07 वाजता

- पालिका निवडणुकीत अशोक चव्हाण यांचीच सरशी, काँग्रेसचे उमेदवार १९ जागांवर आघाडीवर, भाजप पिछाडीवर तर शिवसेना एका जागेवर आघाडीवर 

कॉंग्रेस - 19
भाजप - 02
शिवसेना - 01
राष्ट्रवादी - 00
एम आय एम - 00