Gudi Padwa Celebration LIVE : आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा! राज ठाकरे काय बोलणार?

Gudi Padwa Celebration LIVE :  आज चैत्र प्रतिपदा...मराठी नूतन वर्ष...आज घरोघरी विजयाचं प्रतिक गुढी उभारण्यात आली आहे. मुंबई, पुणे आणि नागपुरात गुढी पाडव्यानिमित्त भव्य शोभा यात्रा निघाल्या आहेत. 

Gudi Padwa Celebration LIVE : आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा! राज ठाकरे काय बोलणार?

Gudi Padwa Celebration LIVE : गुढीपाडव्याला मराठी नववर्षांचं उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात येतंय. डोंबिवली, कल्याण, ठाणे आणि गिरगावात शोभायात्रांच्या माध्यमातून नववर्षाचं स्वागत करण्यात येतंय.. पारंपरिक वेशभूषेत तरुणाईसह लहानथोर उत्साहाने या शोभायात्रांमध्ये सहभागी होत आहेत... या शोभायात्रांच्या माध्यमातून केवळ तरुणाई नटून थटून बाहेर पडते असं नाही तर यातून विविध सामाजिक संदेशही दिले जात आहेत.. 

9 Apr 2024, 08:53 वाजता

Nagpur Shobha Yatra Live : हिंदू नववर्ष स्वागतताचा जल्लोष नागपुरातही दिसून येतोय. तात्या टोपे गणेश मंदिर ते लक्ष्मीनगर चौकापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. या शोभा यात्रेत अभिनेत्री प्राजक्ता माळी सहभागी झाली होती. 

9 Apr 2024, 08:51 वाजता

Dombivali Shobha Yatra Live : डोंबिवलीतल्या स्वागत यात्रेचं विशेष आकर्षण असतं. स्वागत यात्रेची मुहुर्तमेढ रोवणा-या डोंबिवलीत यंदाही सळसळत्या तरुणाईचा उत्साह पाहायला मिळतोय. स्वागत यात्रेनिमित्त विविध चित्ररथ आणि सामाजिक संदेश देतायत.  

9 Apr 2024, 08:45 वाजता

Gudi Padwa Celebration LIVE : मराठी वर्षाची सुरुवात चैत्र महिन्याच्या प्रतिपदेपासून होते. यादिवशी महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा उत्साह साजरा करण्यात येतो. यादिवशी घरोघरी श्रीखंड पुरीचा बेत असतो. पण गुढीपाडव्याला श्रीखंड पुरी का खातात माहितीय?

अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा -  गुढीपाडव्यादिवशी का खातात श्रीखंड-पुरी? 'हे' आहेत आरोग्यवर्धक फायदे!

 

9 Apr 2024, 08:42 वाजता

Gudi Padwa Celebration LIVE : गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गूळ खातात. पण तुम्ही कधी विचार केलाय का? सणाच्या दिवशी कडू प्रसाद का खाल्ला जातो? 

अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा -  Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्याला कडू लिंबाचा पाला आणि गुळ का खातात? जाणून घ्या पारंपारिक आणि वैज्ञानिक कारण

 

9 Apr 2024, 08:22 वाजता

Kalyan Shobha Yatra Live : कल्याणमध्येही हिंदू नववर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात येतंय.. ढोल ताशाच्या गजरात कल्याणमध्ये शोभायात्रा काढण्यात आलीये... यंदा इंडियन मेडिकल असोशिएशननं या शोभायात्रेचं आयोजन केलंय....चौका चौकात काढलेल्या भव्य रांगोळ्या हे या शोभायात्रेचं विशेष आकर्षण ठरतंय..

9 Apr 2024, 08:12 वाजता

Nagpur Shobha Yatra Live : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही नागपुरातील शोभायात्रेत

हिंदू नववर्ष स्वागतताचा जल्लोष नागपुरातही दिसून येतोय. तात्या टोपे गणेश मंदिर ते लक्ष्मीनगर चौकापर्यंत शोभायात्रा काढण्यात येतेय. नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झालेत. विजयाची उंच उंच गुढी उभारणार अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी झी24तास शी बोलताना दिली. तर या गुढीपाडव्याला प्रभू श्रीरामाचं मंदिर अयोध्येत निर्मित झालंय, त्यामुळे अतिशय आनंदाचा गुढीपाडवा आहे असंही फडणवीसांनी म्हटलंय.

9 Apr 2024, 08:08 वाजता

Gudi Padwa Celebration LIVE : गुढीपाडव्याला मराठी नववर्षांचं उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात येतंय. डोंबिवली, कल्याण, ठाणे आणि गिरगावात शोभायात्रांच्या माध्यमातून नववर्षाचं स्वागत करण्यात येतंय.. पारंपरिक वेशभूषेत तरुणाईसह लहानथोर उत्साहाने या शोभायात्रांमध्ये सहभागी होत आहेत... या शोभायात्रांच्या माध्यमातून केवळ तरुणाई नटून थटून बाहेर पडते असं नाही तर यातून विविध सामाजिक संदेशही दिले जात आहेत.. 

9 Apr 2024, 08:05 वाजता

Gudi Padwa in Maharashtra : चैत्र पाडव्यानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची सुंदर आरास 

साडेतीन मुहूर्त पैकी एक आणि नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढी पाडवाचा हा सण मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा करण्यात येतोय. अशा या शुभ मुहूर्तावर चैत्र पाडवानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची सुंदर आरास करण्यात आलीय. संपूर्ण मंदिर फुलांमध्ये खुलून निघालेय.

9 Apr 2024, 08:01 वाजता

Gudi Padwa Celebration LIVE : गुढीपाडव्यानिमित्त मुंबई- ठाण्यातील वाहतुकीत बदल, कोणत्या मार्गांवर जाणं टाळावं, पर्यायी मार्गांवर कसं जावं? पाहा सविस्तर वृत्त...   

अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा - Gudi Padwa 2024: एकिकडे स्वागत यात्रा, दुसरीकडे पाडवा मेळावा; गुढीपाडव्यानिमित्त मुंबई- ठाण्यातील वाहतुकीत बदल

 

9 Apr 2024, 07:59 वाजता

Gudi Padwa Celebration LIVE : गुढीपाडव्याला घरोघरी गुढी उभारली जाणार आहे. पण तुम्हाला गुढी उभारवी अन् कधी उतरवावी याबद्दल शास्त्रोद्ध पद्धत माहिती आहे का? 

अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा - Gudi Padwa 2024 : पाडव्याला गुढी कशी उभारावी अन् कधी उतरवावी? साहित्याचं नंतर काय करावं?