MNS Gudi Padwa Melava: राज ठाकरेंचा नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर

MNS Gudi Padwa Melava: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. शिवाजी पार्कातील गुढीपाडवा मेळाव्यात त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. नरेंद्र मोदींसाठी आपण महायुतीला पाठिंबा देत असल्याचं ते म्हणाले आहेत.   

MNS Gudi Padwa Melava: राज ठाकरेंचा नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर

MNS Gudi Padwa Melava: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केली आहे. शिवाजी पार्कातील गुढीपाडवा मेळाव्यात त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. नरेंद्र मोदींसाठी आपण महायुतीला पाठिंबा देत असल्याचं ते म्हणाले आहेत. या मेळाव्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं. याचं कारण राज ठाकरे (Raj Thackeray) या मेळाव्यात आपली भूमिका मांडणार होते. गेल्या अनेक दिवसांपासून मनसे आणि भाजपा युतीच्या चर्चा सुरु होत्या. पण अंतर्गत विरोध आणि जागावाटपावरुन फिस्कटलं असल्याचंही बोललं जात होतं. राज ठाकरेंनी यावेळी आपला पक्ष लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट करत नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर केली आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणावरही भाष्य केलं. 

 

9 Apr 2024, 20:09 वाजता

MNS Gudi Padwa Melava: नर्स काय डायपर बदलणार आहेत का? 

महाराष्ट्रात जवळपास 5 वर्षांनी निवडणूक होत आहेत. मी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. महापालिकेच्या निवडणुका अजूनही होत नाही आहेत. त्यामुळे 2019 नंतर आज 2024 मध्ये निवडणुका होत आहेत. आचारसंहितावाले सगळे जागे झाले आहेत. निवडणुकीसाठी महापालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टर, नर्स यांना कामाला लावणार आहे. नर्स काय डायपर बदलणार आहेत का? ज्या रुग्णांसाठी नेमणूक आहे तिथे नसावेत का? ज्या डॉक्टर, नर्सवर जबाबदारी आहे त्यांनी जाऊ नये. रुग्णालयात जाऊन काम करा. तुम्हाला नोकरीवरुन कोण काढतो ते मी बघतो.

9 Apr 2024, 19:56 वाजता

MNS Gudi Padwa Melava: राज ठाकरे शिवाजी पार्कात दाखल

राज ठाकरे शिवाजी पार्कात दाखल झाले आहेत. आता थोड्याच वेळातच राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. 

 

9 Apr 2024, 17:46 वाजता

MNS Gudi Padwa Melava: "राज ठाकरे वाघमाणूस, पण त्यांचा कोल्हा करण्याचा प्रयत्न"

राज ठाकरे वाघ माणूस आहे, पण सत्ताधारी त्यांचा कोल्हा करणयाचा प्रयत्न करत आहेत. आपण दिल्लीच्या सत्तेपुढे झुकणार नाही असं ते वारंवार म्हणत होते. पण दिल्लीची वारी करावी लागली यावरुन त्यांना अडचणीत आणण्याचं आणि पिंजऱ्यात अडकवण्याचा प्रयत्न सुरु असल्याची शंका आहे असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.