Loksabha Election 2024 Live Updates: दक्षिण मुंबईतून यामिनी जाधवांनी भरला उमेदवारी अर्ज

Lok Sabha Elections Live Updates: प्रचारसभा, उमेदवारी, अर्ज दाखल करताना शक्तीप्रदर्शन हे मागील काही दिवसांपासून दिसत असलेलं चित्र आजही भारतामधील अनेक भागांमध्ये दिसत आहे. आज दिवसभरात राजकीय वर्तुळामध्ये नेमकं काय काय घडलं, जाणून घेऊयात या लाइव्ह ब्लॉगमधून...

Loksabha Election 2024 Live Updates: दक्षिण मुंबईतून यामिनी जाधवांनी भरला उमेदवारी अर्ज

Lok Sabha Elections Live Updates 3 May 2024: लोकसभा निवडणुकीची तिसऱ्या टप्प्यातील मतदान अवघ्या काही दिवसांवर आलेले असतानाच निवडणुकीचा प्रचार, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींचा जोर वाढू लागला आहे. आजही राज्यासहीत भारतामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रचारसभा होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात आजच्या दिवसभरातील घडामोडींचे क्षणोक्षणाचे अपडेट्स या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून...

3 May 2024, 16:24 वाजता

दक्षिण मुंबईतून आमच्या यामिनी जाधव या उमेदवार आहे. आजचा उत्साह पहता त्या मोठ्या फरकाने निवडून येतील आम्ही आम्ही केलेल्या विकासावर मत मागतोय.अडीच वर्षात आम्ही फक्त विकास कामांना प्राधान्य दिलं, आणि त्याच जोरावर मत मागतोय.- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

3 May 2024, 16:15 वाजता

चित्रा वाघ यांनी ज्याचा फोटो Adult Star म्हणून दाखवला, तो अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार! म्हणाला- 48 तासांच्या आत…

चित्रा वाघ यांनी ज्याचा फोटो Adult Star म्हणून दाखवला, तो अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार! म्हणाला- 48 तासांच्या आत…ठाणे, रत्नागिरीमध्ये एकीकडे उमेदवारी, निवडणूक प्रचारावरुन हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये पॉलिटिकल कॅम्पेनवरुन चांगली जुंपली आहे. 'पॉर्न स्टार' शब्दावरुन लोकसभा निवडणुकीत राज्यात आता वाद सुरु झालाय. भाजपच्या चित्रा वाघ यांनी थेट फोटोच दाखवत उद्धव ठाकरेंच्या निवडणुकांच्या जाहिरातीवर आक्षेप घेतलाय. यामुळे अभिनेते  प्याराली उर्फ राज नयानी हे व्यथित झाले आहेत. त्यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांना गंभीर इशारा दिलाय. येथे क्लिक करुन वाचा सविस्तर वृत्त...

3 May 2024, 15:57 वाजता

देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे यांचे संबंध एवढे का बिघडले?

3 May 2024, 14:31 वाजता

संजय निरुपम आज शिंदे गटात प्रवेश करणार

 
काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे नेते संजय निरुपम आज संध्याकाळी शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. निरुपम मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना 2 दिवसांपूर्वीच भेटले होते. त्याचवेळी त्यांनी पक्षप्रवेशाची घोषणा केलेली.

3 May 2024, 14:15 वाजता

राहुल गांधींनी भरला उमेदवारी अर्ज

काँग्रसचे नेते राहुल गांधींनी रायबरेलीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्याबरोबर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, सोनिया गांधी, प्रियंका गांधीही उपस्थित होत्या.

3 May 2024, 14:13 वाजता

ठाण्यातून नरेश म्हस्केंना उमेदवारी दिल्याने भाजपा पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

ठाण्यात भाजपा पदाधिकाऱ्यांच्या नाराजीचा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. शिंदे गटाच्या नरेश म्हस्केंना उमेदवारी दिल्याने भाजपा पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत. या भाजपा समर्थकांना गणेश नाईक किंवा संजीव नाईक यांना तिकीट देण्याची मागणी केली आहे.

3 May 2024, 14:12 वाजता

राहुल गांधींची आज पुण्यात सभा; तर दोन्ही उपमुख्यमंत्री बारामतीत

काँग्रसचे नेते राहुल गांधी आज पुण्यात सभा घेणार आहेत. तर दुसरीकडे आज दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस बारामतीत असणार आहेत. ते सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार आहेत.

3 May 2024, 13:41 वाजता

पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्याविरोधात वक्तव्य करताना सांगलीकरांविषयी हे काय बोलले संजय राऊत?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र नाराजीचा सूर आळवला आहे. मोदी आणि शाह अडचणीत असून खोटं बोलत असल्याची टीका राऊतांनी केली. यावेळी चाणक्यनितीतील अडचणीतला व्यापारी आणि त्याची खोटं बोलण्याची सवय याचा संदर्भ त्यांनी दिला. सध्याच्या घडीला शिंदे गटाच्या शिवसेनेवर असणारं पंतप्रधानांचं प्रेम खोटं असल्याचं म्हणत त्यांनी यावेळी पवार कुटुंबात पक्षातील वर्चस्वाच्या मुद्द्यावरून फूट पडल्याच्या सर्व चर्चा त्यांनी धुडकावल्या. येथे वाचा सविस्तर वृत्त...

3 May 2024, 12:36 वाजता

नाशिकचा पेच संपता संपेना! रिंगणात पुन्हा नवा उमेदवार? महायुती, मविआची धाकधुक वाढवणार

नाशिकमध्ये 20 मे रोजी मतदान होणार असून महाराष्ट्रातील 5 व्या टप्प्यातील मतदानामधील 13 मतदारसंघामध्ये नाशिकचा समावेश आहे. नाशिकमधून उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. नाशिकमधून महायुतीचा उमेदवार निवडताना अनेक उलट-सुलट घडामोडी घडल्या. यानंतर अखेर शिंदे गटाने हेमंत गोडसेंना उमेदवारी जाही केली आणि महायुतीचा नाशिकचा उमेदवार कोण या चर्चेवर पडदा पडला. एकीकडे हा सस्पेन्स संपला असताना आता पुन्हा एकदा नाशिकमधील निवडणुकीत नवीन ट्विस्ट आला आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त...

3 May 2024, 11:16 वाजता

सुप्रिया सुळेंना बच्चू कडूंनी जाहीर केला पाठिंबा

प्रहार शेतकरी संघटनेचे नेते आणि महायुतीबरोबर असलेल्या बच्चू कडू यांनी बारामतीमध्ये शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळेंना पाठिंबा जाहीर केला आहे. अमरावतीनंतर बारामती हा दुसरा मतदारसंघ आहे जिथे महायुतीमध्ये असूनही कडू यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करत वेगळी भूमिका घेतली आहे.