Loksabha Election 2024 Live Updates : राज्यात चौथ्या टप्प्यात 53.18% मतदान, तर देशात संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 62.80 टक्के मतदान

Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार आज थांबणार आहे. मराठवाडा, पुणे, शिरूर, नगर, बीडमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावरणार असून राज्यातील 11 जागांसाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे. 

Loksabha Election 2024 Live Updates :  राज्यात चौथ्या टप्प्यात 53.18% मतदान, तर देशात संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 62.80 टक्के मतदान

Loksabha Election 2024 Live Updates :  लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील पुण्यासह मावळ आणि शिरूर मध्ये आज प्रचाराची सांगता होणार असून 13 तारखेला मतदान होणार आहे. पुणे, मावळ, शिरूर मधील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. त्यामुळे आज शेवटच्या दिवशी सभा, गाठीभेटी आणि रोड शोचा धुरळा आहे. मावळमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोडशो
तर पुण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा आहे.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही पुण्यात तळ ठोकून बसले आहेत.
शिरूरमध्ये शरद पवार यांची सभा होणार आहे. 

 

13 May 2024, 21:28 वाजता

राज्यात चौथ्या टप्प्यात 53.18% मतदान झाले.

सर्वाधिक मतदान नंदुरबार मतदारसंघात झाले. 60.60% मतदान झाले. 

सर्वात कमी म्हणजे 43.89% मतदान पुण्यातील शिरुर मतदारसंघात झाले. 

जालनामध्ये 59.44 टक्के, तर पुण्यात 44.90 टक्के मतदान झाले. 

देशात चौथ्या टप्प्यासाठी 63.28 टक्के मतदान झाले. 

पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 75.91 टक्के मतदान झाले. 

जम्मू काश्मीरमध्ये सर्वात कमी 36.58 टक्के मतदान झाले. 

आंध्र प्रदेशमध्ये 68.12 % मतदान, तर बिहारमध्ये 55.90 % मतदान  झाले. 

13 May 2024, 17:01 वाजता

उद्धव ठाकरेंच्या सभेला पावसाचा फटका, पावसामुळे डोंबिवलीतील नियोजित सभा रद्द करण्यात आली आहे. 

11 May 2024, 15:28 वाजता

पालघरमधील जलदेवी येथे उद्धव ठाकरेंच्या बैठका सुरू आहेत . वकील , मुस्लिम अशा 21 संघटनांसोबत चर्चा सुरू आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत विनायक राऊत , मिलिंद नार्वेकर , राष्ट्रवादीचे आमदार सुनील भुसारा , माकपाचे आमदार विनोद निकोले , उमेदवार भारती कामडी उपस्थित आहेत.

11 May 2024, 15:07 वाजता

नंदुरबार येथे काँग्रेस उमेदवार एड. गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी आलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी सभा संपल्यानंतर अचानक लोकांमध्ये जात त्यांच अभिवादन स्वीकारलं. प्रियांका गांधी सभा स्थळापासून हेलिपॅडकडे परत जात असताना अचानक गाडीतून खाली उतरल्या आणि सुरक्षा रक्षकांचे एकच धावपळ उडाली. प्रियांका गांधी यांनी गाडीखाली उतरत जनतेमध्ये जात लोकांच अभिवादन स्वीकारलं.

11 May 2024, 14:44 वाजता

हेमंत सावरा यांना जिंकवण्यासाठी आम्ही साम दाम दंड भेद याचा वापर करू, आमचा उमेदवार घासून नाही तर ठासून निवडून आणू असा विश्वास नितेश राणेंनी व्यक्त केला.जनतेने भाजपचा खासदार निवडून दिला तर तो थेट पंतप्रधानांशी बोलू शकतो दुसऱ्या कोणत्या पक्षाचा हा खासदार असेल तर त्याला रांगेत उभे राहावे लागेल, असे ते म्हणाले.. त्यामुळे जनतेने भाजपच्या उमेदवाराला निवडून द्यावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

 

11 May 2024, 14:25 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : प्रियांका गांधींनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल 

नंदुरबारमधल्या प्रचारसभेतून प्रियांका गांधींनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. कुठे शबरी आणि कुठे मोदी असा सवाल विचारत मोदींनी महिलांवर अत्याचार करणा-यांना उमेदवारी दिली अशी टीका प्रियांका गांधींनी केली. 

 

11 May 2024, 12:28 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : संभाजीनगरात ठाकरे गट-महायुतीचे कार्यकर्ते आमने-सामने

आता बातमी येतेय संभाजीनगरातून...संभाजीनगरात शिवसेना ठाकरे गट आणि महायुतीचे कार्यकर्ते आमने-सामने आलेयत...दोन्ही गट प्रचारादरम्यान समोरा समोर आल्याने जोरदार घोषणाबाजीसोबत कार्यकर्त्यांनी एकमेकांना हाणामारी केली. त्यामुळे घटनास्थळावरील वातावरणात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. 

11 May 2024, 10:26 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : अहमदनगरमध्ये कोण होणार खासदार? 

पाहा निवडणूक यात्रा

11 May 2024, 10:24 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : 17 मे रोजी केजरीवाल यांची मुंबईत सभा; राऊतांनी दिली माहिती

आमच्या मुंबईमध्ये 17 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा आहेत. त्याचवेळी महाविकास आघाडीच्या मंचावरुन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही भाषण करणार आहेत. केजरीवाल यांनी या सभेचं आमंत्रण स्वीकारलं आहे. केजरीवाल यांना काल म्हणजेच 10 मे रोजी 22 दिवसांसाठी अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर ते आजपासून प्रचारसभांमध्ये सहभागी होत आहेत.

 

11 May 2024, 10:12 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी कोणाच्या कुठे सभा?

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी 6 वाजता थंडावणार आहे. याआधी सगळे उमेदवार शक्य तितक्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील. दिग्गज नेतेही प्रचाराच्या रिंगणात उतरलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज मावळमध्ये श्रीरंग बारणेंसाठी रोड शो होणारेय. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात आहेत. गडकरींची पुण्यातल्या नातूबाग इथं सभा होणारेय. शरद पवारांची पुण्यात सभा आहे. याठिकाणी आदित्य ठाकरेही उपस्थित राहणारेत. पवारांची बीडमध्येही सभा आहे. तर उद्धव ठाकरेंचा प्रचाराचा झंझावात सुरुच आहे. ते आज पालघरचा दौरा करतील. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची नंदुरबारचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्यासाठी सभा होणारेय. तर भाजप खासदार अशोक चव्हाण, नवनीत राणा संभाजीनगरात आहेत. महायुतीच्या नेत्यांचा ते प्रचार करतील.