Loksabha Election 2024 Live Updates : काँग्रेसला मोठा धक्का, रश्मी बर्वे यांचा निवडणूक अर्ज रद्द

Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभेसाठी महाविकास आघाडीसह महायुतीचा जागावाटपाचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे. वाचा सर्व राजकीय घडामोडी एका क्लिकवर...

Loksabha Election 2024 Live Updates : काँग्रेसला मोठा धक्का, रश्मी बर्वे यांचा निवडणूक अर्ज रद्द

Loksabha Election 2024 Live : लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली असली तरी राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. एकीकडे मविआमधील जागावाटप पूर्ण होण्याआधीच ठाकरे गटाने 17 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामुळे मविआमध्ये धुसफूस सुरु झाली आहे. ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या यादीवर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे महायुतीतील जागावाटपाचा सस्पेन्स लवकरच संपणार असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे दिवसभरात मोठ्या घडामोडी घडण्याच्या शक्यता आहेत. इथं पाहा वेगवान अपडेट.... 

28 Mar 2024, 20:44 वाजता

रश्मी बर्वे यांचा निवडणूक अर्ज रद्द

रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द केला होता. त्यानंतर आता रामटेक लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रश्मी बर्वे यांचे निवडणूक अर्ज रद्द केला आहे. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. 

28 Mar 2024, 19:06 वाजता

शिवसेनेच्या शिंदे गटाची पहिली उमेदवार यादी  जाहीर 

मावळ- श्रीरंग बारणे
रामटेक- राजू पारवे
हातकणंगले - धैर्यशील माने
कोल्हापूर- संजय मंडलिक
हिंगोली - हेमंत पाटील
बुलढाणा - प्रतापराव जाधव
शिर्डी - सदाशिव लोखंडे

दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे 

28 Mar 2024, 18:54 वाजता

शासकीय सुट्टीच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालय सुरु राहणार

29  मार्च ते 31 मार्च दरम्यान शासकीय सुट्टीच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालय सुरु राहणार, 1 एप्रिलला कार्यालयात गर्दी होत असल्याने निर्णय

28 Mar 2024, 16:07 वाजता

Loksabha Election 2024 Live : उद्धव ठाकरेंचा हातकणंगलेतून उमेदवारीचा प्रस्ताव चेतन नरकेंनी नाकारला नाकारला

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर इच्छुक असणारे चेतन नरके यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आलेला हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा प्रस्ताव नाकारला आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेल्यामुळे चेतन नरके नाराज झाले होते , त्यामुळें उद्धव ठाकरे यांनी चेतन नरके यांना मातोश्रीवर बोलावून हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा प्रस्ताव ठेवला होता, याला चेतन नरके यांनी नकार दिला आहे. मी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काम केला आहे , त्यामुळे याच मतदारसंघात मला उमेदवारी मिळावी अशी मागणी देखिल चेतन नरके यांनी केली आहे. कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना चेतन नरके यांनी ही मागणी केली आहे.

28 Mar 2024, 15:29 वाजता

Loksabha Election 2024 Live : लोकसभेसाठी राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसाठी 37 जणांची स्टार प्रचारक यादी राष्ट्रीय सरचिटणीस एस. आर. कोहली यांनी जाहीर केली आहे.

या स्टार प्रचारक यादीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे,अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, कृषी मंत्री धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव, के. के. शर्मा, सय्यद जलालूद्दीन, माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आमदार आणि प्रदेश प्रवक्ते अमोल मिटकरी, आमदार सुनिल टिंगरे, आमदार इंद्रनील नाईक, आमदार सुनिल शेळके, आमदार विक्रम काळे, आमदार चेतन तुपे, आमदार नितीन पवार, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री आमदार दत्तामामा भारणे, आमदार सतीश चव्हाण, मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, माजी आमदार अमरसिंह पंडित, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस नायकवडी आदींचा समावेश आहे.

28 Mar 2024, 12:32 वाजता

Loksabha Election 2024 Live : रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र रद्द

रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं आहे. जात पडताळणी समितीकडून रश्मी बर्वेंच जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं आहे.

28 Mar 2024, 12:24 वाजता

Loksabha Election 2024 Live : भाजपच्या राणा जगजितसिंह यांना राष्ट्रवादीकडून ऑफर

तुळजापुरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सकाळी भेट घेतली. धारशिवची जागा राष्ट्रवादीच्या कोट्यातून लढा अशी विचारणा राणा जगजितसिंह पाटील यांना राष्ट्रवादीकडून करण्यात आली. मात्र या प्रस्तावास राणा पाटील यांनी नकार दिला. धाराशिवच्या जागेबद्दल राणा जगजित सिंग पाटील आणि बसवराज पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. मात्र मागच्या निवडणुकीत राणा जगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये केला होता. 

28 Mar 2024, 12:10 वाजता

Loksabha Election 2024 Live : महायुतीत जागावाटपावरुन अद्याप तिढा

महायुतीचे जागावाटप आज जाहीर होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शुक्रवारी तिन्ही पक्षांचे नेते एकत्रित पत्रकार परिषद घेवून जागावाटप आणि उमेदवारांची घोषणा करणार आहेत. अद्यापही काही जागांवरून महायुतीत तिढा असल्याने जागावाटप रखडल्याचे म्हटलं जात आहे. नाशिक,रत्नागिरी सिंधुदूर्ग, हातकणंगले, ठाणे या जागांचा अद्याप निर्णय झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

28 Mar 2024, 12:07 वाजता

Loksabha Election 2024 Live : महायुतीचे जागावाटप रखडलं

महायुतीचे जागावाटप आज जाहीर होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शुक्रवारी तिन्ही पक्षांचे नेते एकत्रित पत्रकार परिषद घेवून जागावाटप आणि उमेदवारांची घोषणा करणार आहेत. अद्यापही काही जागांवरून महायुतीत तिढा असल्याने जागावाटप रखडल्याचे म्हटलं जात आहे. नाशिक,रत्नागिरी सिंधुदूर्ग, हातकणंगले, ठाणे या जागांचा अद्याप निर्णय झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

28 Mar 2024, 11:07 वाजता

Loksabha Election 2024 Live : रायगड लोकसभेवर भाजपचा दावा

रायगड लोकसभेवर भाजपने दावा केल्याने खासदार सुनील तटकरेंच्या अडचणी वाढणार आहेत. भाजपने रायगड लढण्यासाठी भाजप पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.  शेकापमधून भाजपात आलेले धैर्यशील पाटील देखील नाराज झाले आहेत. त्यामुळे भाजप पदाधिकारी धैर्यशील पाटील यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेणार आहेत. यासोबत धैर्यशील पाटील यांनी यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात येणार आहे.