Onion Export : कांदा निर्यातमूल्यावरून भारत-पाकिस्तानात स्पर्धा

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Onion Export : कांदा निर्यातमूल्यावरून भारत-पाकिस्तानात स्पर्धा

9 May 2024, 11:49 वाजता

पुढील 3 तासांत नागपुरात पावसाचा ऑरेंज अलर्ट 

 

Nagpur Rain Alert : पुढील तीन तासांसाठी नागपुरात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. नागपूर हवामान विभागाने हा अलर्ट जारी केलाय. नागपूर जिल्हामध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहनही करण्यात आलंय. नागपुरात
सकाळच्या सत्रात 47 मिमी पावसाची नोंद झालीय. शहरातील रस्ते जलमय झाले होते. तसंच अनेक भागात बत्ती गुल झाली होती. 

9 May 2024, 11:07 वाजता

'उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन ढासळलं', देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

 

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर नाव न घेता हल्लाबोल केला होता, दिल्लीश्वरांची दोन चावी दिलेली माकडं अशी टीका ठाकरेंनी केली होती.. त्याला उपमुख्यमंत्री फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय.. उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन ढासळलंय, त्यांना वैद्यकीय उपचारांची गरज आहे असा पलटवार फडणवीसांनी केलाय.. 
 

9 May 2024, 10:28 वाजता

'महिन्याभरात आमदार, नंतर खासदार झालात',गिरीश महाजनांची उन्मेष पाटलांवर टीका

 

Girish Mahajan On Unmesh Patil : मंत्री गिरीश महाजन यांनी उन्मेष पाटलांवर टीका केलीय. तुम्हाला तिकिट मिळावं म्हणून मी दिल्लीत जाऊन अडून बसलो होतो, वाद घातला होता.. अशी आठवण महाजनांनी करुन दिली.. पक्षात आल्यानंतर महिन्याभरात तुम्हाला आमदारकी मिळाली अशी टीकाही महाजनांनी केली.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

9 May 2024, 10:20 वाजता

पुण्यात पुन्हा कोयता गँग सक्रिय

 

Pune Koyta Gang : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात पुन्हा कोयता गँग सक्रिय झालीये. मोहम्मदवाडीत कोयता गँगने एका टपरी चालकावर हल्ला चढवलाय. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत चित्रीत झालाय. यात गँगमधील तीन जण टपरीवाल्यावर कोयत्यानं वार करताना दिसून येतायेत. यात टपरीचालक गंभीर जखमी झालाय. तर याप्रकरणी या तिघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

9 May 2024, 09:38 वाजता

8 जूनला आष्टीत मनोज जरांगेंची संवाद बैठक

 

Manoj Jarange : बीडच्या आष्टीमध्ये मनोज जरांगेची संवाद बैठक आयोजीत करण्यात आलीये... 8 जूनला नारायणगडमध्ये गरजवंत मराठ्यांची विराट महासभा होणार आहे.. या सभेच्या नियोजनासाठी अंभोरा आणि वाघुळ या दोन गावांमध्ये संवाद बैठक आयोजीत करण्यात आलीये.. या बैठीसाठी 1 हजार स्वयंसेवकाची नियुक्ती करण्यात आलीये. ..तसंच संभाव्य अडचणी लक्षात घेता या ठिकाणी 3 रुग्णवाहिका, 15 डॉक्टरांची टीमही तैनात करण्यात आलीये. प्रशासनाची परवानगी घेऊन ही बैठक आयोजित करण्यात आली असून बैठकीसाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय. 

 

9 May 2024, 09:13 वाजता

नाशिक ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजरांवर तडीपारीची नोटीस

 

Sudhakar Badgujar :  ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर तडीपारीची कारवाई.. पोलीस नोटीस बजावण्यासाठी गेले असता बडगुजरांनी नोटीस घेतली नाही...बडगुजर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याची माहिती..

9 May 2024, 08:43 वाजता

पुण्यात उद्या राज ठाकरेंची सभा

 

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ उद्या पुण्यात धडाडणारेय. पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे मैदानात उतरणारेय. सारसबाग इथं उद्या संध्याकाळी ही सभा होणारेय. महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही दुसरी सभा होतेय. याआधी नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सभा झाल्यानंतर उद्या पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे सभा घेतायत. 

9 May 2024, 08:16 वाजता

प्रियंका चतुर्वेदींचं वादग्रस्त विधान

 

Priyanka Chaturvedi On CM Shinde : घाटकोपरच्या सभेत शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदींनी श्रीकांत शिंदेंवर शेलक्या शब्दात टीका केली. एका सिनेमाचा दाखला देत प्रियांका चतुर्वेदींनी मुख्यमंत्र्यांसह श्रीकांत शिंदेंवर बोचरी टीका केली.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

9 May 2024, 07:50 वाजता

17 मे रोजी शिवाजी पार्कवर मनसे-महायुतीची सभा

 

Mahayuti Sabha : 17 मे रोजी मुंबईत शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी अखेर मनसेला परवानगी मिळालीय. शिवसेना ठाकरे पक्षानंही सभेसाठी अर्ज केला होता मात्र सभेची परवानगी मनसेला मिळालीय. सर्वात आधी आम्ही अर्ज केला होता, त्यामुळे मनसेला परवानगी मिळाल्याचं संदीप देशपांडेंनी सांगितलंय.. त्यामुळे 17 मे रोजी मुंबईत मनसे-महायुतीची एकत्र सभा होतेय, यात राज ठाकरे महायुतीच्या नेत्यांसोबत मंचावर असतील. 

9 May 2024, 07:41 वाजता

एअर इंडिया एक्स्प्रेस कंपनीकडून धडक कारवाई

 

Air India : एअर इंडिया एक्स्प्रेसच्या संप करणा-या अनेक कर्मचा-यांना थेट बडतर्फ करण्यात आलंय.. गटबाजी करत सेवा विस्कळीत करणे आणि नियुक्तीच्या अटींचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत एअर इंडिया एक्स्प्रेसनं त्यांना बडतर्फ केलंय. विमानसेवा सुरळीत सुरु ठेवण्यासाठी कमीत कमी उड्डाणं रद्द करण्यावर कंपनीचा भर आहे. एअर इंडिया एक्स्प्रेसच्या कर्मचा-यांनी आज टाऊन हॉल मीटिंग बोलावलीय, यात आपल्या समस्या उघडपणे मांडण्यासंबंधी कर्मचा-यांना सूचना देण्यात आल्यात. प्रवाशांचा विचार करुन कर्मचा-यांनी रुजू व्हावं असं कंपनीकडून सांगण्यात आलंय.. 100 हून अधिक क्रू मेंबर्स अचानक सिक लिव्हवर गेल्यामुळे एअर इंडिया एक्स्प्रेसच्या अनेक उड्डाणांवर त्याचा परिणाम झालाय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-