Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

10 May 2024, 16:18 वाजता

'मोदींना त्यांचा पराभव दिसतोय...',संजय राऊतांची पंतप्रधान मोदींवर टीका

 

Sanjay Raut on PM Modi :  पंतप्रधान मोदी अस्वस्थ आहेत, त्यांना त्यांचा पराभव दिसत असल्यामुळे ते अशी वक्तव्य करत असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलीय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

10 May 2024, 15:41 वाजता

शरद पवार, उद्धव ठाकरेंना पंतप्रधान मोदींची ऑफर

 

PM Narendra Modi : नंदूरबारमधील सभेतून पंतप्रधान मोदींनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना एनडीएत येण्याची ऑफर दिलीय...पवारांनी काँग्रेससोबत जाण्यापेक्षा अजित पवारांसोबत यावं...तर उद्धव ठाकरेंनी शिंदेंसोबत यावं अशी ऑफर मोदींनी दिली...मात्र...पंतप्रधान मोदींची ऑफर शरद पवारांनी धुडकावून लावली...मोदींची भाषणं ही देशाच्या हितासाठी नाहीत...देशाच्या हिताचं नाही तिथे जाणार नाही असं प्रत्युत्तर शरद पवारांनी दिलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

10 May 2024, 13:45 वाजता

किरण सामंत विधानसभा लढण्यासाठी लागले कामाला

 

Kiran Samant : किरण सामंत यांनी मोठं विधान केलंय.  आगामी विधानसभा निवडणूक लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परवानगी दिली तर निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी बोलून दाखवलंय. किरण सामंत कोकणातून लोकसभा लढण्यासाठी इच्छुक होते. ऐनवेळी त्यांनी लोकसभेतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं. मात्र यातून शिंदेंची शिवसेना आणि भाजपमधील मतभेद लपून राहिले नव्हते. आता किरण सामंतांनी आतापासून विधानसभेशाठी शड्डू ठोकलाय. मात्र,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेतील, यावर अवलंबून राहणारेय....

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

10 May 2024, 12:35 वाजता

Narendra Dabholkar : नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी सचिन अंदूरे आणि शरद कळसकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय...सचिन अंदूरे आणि शरद कळसकरवर गुन्हा सिद्ध झाला असून, दोघांना 5 लाखांचा दंड आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय...तर वीरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची निर्दोष सुटका करण्यात आलीय...2013 साली नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाली होती...तब्बल 11 वर्षानंतर दाभोलकरांच्या मारेक-यांना शिक्षा सुनावण्यात आलीय...

बातमी पाहा - मोठी बातमी : नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी दोघांना जन्मठेप, तिघे निर्दोष

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

10 May 2024, 11:45 वाजता

सावधान! शेतकऱ्यांना बोगस बियाणांची विक्री?

 

Yavatmal Duplicate Fertilizer : ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर यवतमाळमध्ये शेतक-यांना बोगस बियाणांची विक्री केली जातेय. कृषी विभागानं मारेगाव तालुक्यातील चिंचाळा इथं छापा टाकून 78 बोगस बियाणांची पाकिटं जप्त केलीय. विलास चिकटे असं या आरोपीचं नाव आहे. त्याने स्वत:च्या घरात हा बोगस बियाणांचा साठा लपवून ठेवला होता. एकिकडे बळिराजा खरीप पेरणी पूर्व मशागतीच्या लगबगीला लागलाय. तर दुसरीकडे बोगस बियाणांची विक्री करून शेतक-यांची फसवणूक केली जातेय

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

10 May 2024, 11:42 वाजता

सोन्याच्या दरात 1 हजार रुपयांनी वाढ

 

Gold & Silver Price Hike : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याला झळाळी मिळालीये.. सोन्याचे दर १ हजार रुपायांनी वाढलेत.. त्यामुळे किरकोळ बाजारात सोनं 74 हजार 500 रुपये प्रतितोळे झालंय.. चांदीच्या दरातही वाढ झाली असून चांदी 87 हजार रुपये प्रतिकिलो झालीये.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

10 May 2024, 10:21 वाजता

10वी आणि 12वी परीक्षा शुल्कात वाढ

 

SSC & HSC Exam Fee Hike : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतल्या जाणा-या दहावीच्या परीक्षाशुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यानुसार जुलै-ऑगस्ट 2024मध्ये होणारी पुरवणी परीक्षा, फेब्रुवारी-मार्चमध्ये होणारी मुख्य परीक्षा 2025साठी नवे शुल्क आकारले जाणारेय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

10 May 2024, 09:46 वाजता

चौथ्या टप्प्यातील प्रचार शिगेला

 

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय.. आज दिग्गज नेते प्रचाराच्या रिंगणात उतरले.. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात सभा घेणार आहेत.. मुरलीधर मोहोळांच्या प्रचारासाठी राज पुण्यात उतरलेत.. तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे आज संभाजीनगरात आहेत.. त्यामुळे संभाजीनगरचं वातावरण तापणार आहे.. संभाजीनगरनंतर उद्धव ठाकरेंची जालन्यातही सभा आहे.... उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शिवाजीराव आढळराव पाटलांच्या प्रचारासाठी भोसरीत सभा घेणार आहेत.. तर शरद पवारांची चाकणमध्ये सभा होणार आहे.. सुप्रिया सुळेही निलेश लंकेंच्या प्रचारासाठी पारनेरमध्ये प्रचारसभा घेणार आहेत... पंकजा मुंडे सुजय विखेंच्या प्रचारासाठी पाथर्डीत सभा घेतायत तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची सिल्लोड आणि माजलगावात प्रचासरभा होणार आहेत..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

10 May 2024, 09:42 वाजता

नागपुरात अवकाळी पावसाचा धान्याला फटका

 

Nagpur Rain : कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ठेवलेली शेकडो मिरचीची पोती अवकाळी पावसामुळे भिजली. तसंच शेड बाहेर ठेवलेली इतर धान्य भिजल्याची तक्रार आहे. अवकाळी पावसामुळे मिरचीसह धान्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.  गुरुवारी नागपुरात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे व्यापारी आणि शेतक-यांचंही मोठं नुकसान झालंय.बाजार समितीच्या शेडमध्ये आणि आवारात मोठ्या प्रमाणात  धान्य साठा रचून ठेवण्यात आला होता.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

10 May 2024, 08:49 वाजता

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा आज निकाल

 

Narendra Dabholkar : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या खटल्याचा निकाल आज लागणार आहे. 20 ऑगस्ट 2013 रोजी मॉर्निंग वॉकला गेले असताना पुण्यातल्या विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या घालून दाभोलकरांची हत्या करण्यात आली होती. पुणे पोलिसांनी सुरुवातीला तपास केल्यानंतर 2014 मध्ये तो सीबीआयकडे सोपवण्यात आला. या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांना अटक करण्यात आली होती.  आरोपी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे सध्या जामिनावर आहेत.  आरोपींवर कलम 302 म्हणजे हत्या, कलम 120 ब म्हणजे गुन्ह्याचा कट रचणे त्याचप्रमाणे शस्त्र अधिनियमनासंबंधीच्या कलम 34 नुसार आरोप निश्चित करण्यात आलेले आहे. तसंच आरोपींवर  UAPA देखील लावण्यात आलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -