Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

11 May 2024, 22:26 वाजता

'प्रक्षोभक बोलणाऱ्या ओवैसींवर गुन्हा दाखल का नाही?',नवनीत राणांचा सवाल

 

Navneet Rana : प्रक्षोभक बोलणा-या ओवैसींवर गुन्हा दाखल का केला जात नाही?, असा सवाल भाजप नेत्या नवनीत राणा यांनी केलाय. संभाजीनगरमध्ये त्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी MIMसह काँग्रेसवर सडकून टीका केलीय. तेलंगणात काँग्रेसचं सरकार असल्यानं माझावर गुन्हा दाखल झाला, असा दावाही त्यांनी केलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

11 May 2024, 21:45 वाजता

'2 पर्याय होते, गजाआड जाणं, पक्ष बदलणं', रवींद्र वायकरांचा दावा

 

Ravindra Waikar  : ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या रवींद्र वायकर यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत खळबळजनक दावा केला...वायकर म्हणाले चुकीच्या प्रकरणात गोवल्यानंतर दोनच पर्याय होते एक गजाआड जाणे आणि दुसरा पक्ष बदलणे आणि जड अंतकरणाने पक्ष बदलल्याचं वायकर म्हणालेत...वायकर असं का बोलले त्यांना भेट घेऊन विचारणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय...ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

11 May 2024, 20:54 वाजता

'तू मंत्री काय आमदार कसा होतो तेच पाहतो', अजित पवारांची अशोक पवारांना धमकी

 

Ajit Pawar vs Rohit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुर हवेलीचे शरद पवार पक्षाचे आमदार अशोक पवार यांना खुलं चॅलेंज दिलं होतं.. तू मंत्री काय आमदार कसा होतो तेच पाहतो.. अशी खुली धमकीच अजित पवारांनी दिली होती.. त्याला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी उत्तर दिलंय.. पाहुयात काका-पुतण्यात कशी जुंपलीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

11 May 2024, 20:20 वाजता

'...नाही तर राजीनामा देईन', उदयनराजे भोसलेंचं वक्तव्य

 

Udayanraje Bhosale on Pankaja Munde : पंकजा मुंडेंना मतदान केलं नाही तर राजीनामा देईन आणि त्यांना साता-यातून निवडून आणेन, असं विधान उदयनराजे भोसले यांनी केलंय. ते बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी बोलतना उदयनराजे भावूक झाले. बीडच्या जनतेसमोर त्यांनी आपल्या अश्रूला वाट मोकळी करून दिली. तर नेहमीप्रमाणे त्यांनी कॉलर उडवत पंकजांना मतदान करण्याचं आवाहन केलं.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

11 May 2024, 19:18 वाजता

'आम्ही घर फोडत नाही, पक्षही फोडत नाही', देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य

 

Devendra Fadnavis : आम्ही घर फोडत नाही, पक्षही फोडत नाही...आणि सोबत आलं तर संधीही सोडत नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत...शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडल्याच्या आरोपावर उत्तर देताना फडणवीसांनी हे स्पष्ट केलंय...

11 May 2024, 18:34 वाजता

अजित पवारांची पुन्हा जीभ घसरली

 

Ajit Pawar : पुण्यात अजित पवारांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय. जो काम करतो, तोच चुकतो, हे सांगत असताना अजित पवारांनी शिवराळ भाषेचा वापर केलाय. वढू तुळापुर इथल्या कार्यक्रमात छत्रपती संभाजी महाराज एकही निवडणूक हरले नाही असं म्हटलं होतं. मात्र त्यावरून टिंगल करण्यात आली. मात्र जो काम करतो तोच चुकतो, हे सांगताना पवारांनी अपशब्दाचा वापर केला.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

11 May 2024, 17:40 वाजता

'करकरे, साळसकर गेम विदीन गेम नाही ना?',प्रकाश आंबेडकरांचा उज्ज्वल निकमांना सवाल

 

Prakash Ambedkar on Ujjwal Nikam : 26/11 हल्ल्यावरून प्रकाश आंबेडकर यांनी उज्ज्वल निकमांवर निशाणा साधलाय. हेमंत करकरे यांच्या शरीरात घुसलेल्या पाच गोळ्या या कसाब आणि अबू ईस्माईलच्या बंदुकीतून निघालेल्या नाहीत. तसंच साळस्करांच्या शरीरातील दोन गोळ्यांचेही तसेच आहे. या घटनेआडून कुणी डाव साधला ? याचा खुलासा उज्ज्वल निकमांनी करावा, अशी मागणी आंबेडकरांनी केलीय. त्यांच्या शरीरात आढळून आलेल्या बुलेट्स मॅच झाल्या नाहीत. हा विषय कोर्टाच्या निदर्शनास आणून का दिली नाही, असा सवाल आंबेडकरांनी विचारलाय. 

11 May 2024, 17:15 वाजता

सुरेश जैन यांचा महायुतीला पाठिंबा 

 

Suresh Jain : ठाकरे गटाचा राजीनामा दिलेले माजी मंत्री सुरेश जैन यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केलाय...जळगावमध्ये आल्यानंतर आज भाजप नेते गिरीष महाजन यांनी त्यांची भेट घेतली...दोघांची बंद दाराआड चर्चा झाली...त्या भेटीनंतर जैन यांनी कोणी विचारले तर स्मिता वाघ आणि रक्षा खडसे यांना मतदान करा असं आवाहन करेल असं ते म्हणालेत..

बातमीचा व्हिडीओ पाहा- 

11 May 2024, 16:13 वाजता

'नेहरु-गांधींच्या 1 टक्के तरी योगदान आहे का?', शरद पवारांचा मोदींना तिखट सवाल

 

Sharad Pawar on PM Modi : शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिखट सवाल विचारलाय.. नेहरु, गांधी परिवारानं देशासाठी दिलेल्या योगदानाच्या एक टक्का तरी योगदान मोदींनी दिलंय का? असा सवाल पवारांनी मोदींना विचारलाय. मोदींनी नेहरु-गांधी परिवारावरची टीका थांबवावी असं आवाहनही पवारांनी केलंय.. 

11 May 2024, 15:50 वाजता

'महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना मोदींकडून तिकीट', प्रियांका गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका

 

Priyanka Gandhi on PM Modi : नंदुरबारमधल्या प्रचारसभेतून प्रियांका गांधींनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. कुठे शबरी आणि कुठे मोदी असा सवाल विचारत मोदींनी महिलांवर अत्याचार करणा-यांना उमेदवारी दिली अशी टीका प्रियांका गांधींनी केली. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-