Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

12 May 2024, 22:13 वाजता

'फडणवीस मुख्यमंत्री, मोदी-शाहांनी सांगितलं',राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका

 

Raj Thackeray on Uddhav Thackeray : राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय.. 'फडणवीस मुख्यमंत्री, मोदी-शाहांनी सांगितलं'...तेव्हाच आक्षेप का घेतला नाही?...'बाळासाहेबांना अटक करणा-या भुजबळांसोबत मंत्रिमंडळात बसता?'असा सवाल राज ठाकरेंनी विचारलाय.
.

12 May 2024, 20:41 वाजता

पुण्यात रवींद्र धंगेकरांचा पोलीस ठाण्यात ठिय्या

 

Ravindra Dhangekar : पुण्यातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा स्टेशनमध्ये ठिय्या...विरोधी उमेदवाराकडून पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप...पोलीस कारवाई करत नसल्याचे निषेधार्थ पोलीस स्टेशनमध्ये आंदोलन

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

12 May 2024, 19:30 वाजता

 '70 वर्षे काँग्रेस नसती तर तुम्ही पंतप्रधान झाला नसता', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदींवर निशाणा 

 

Mallikarjun Kharge : 70 वर्षे काँग्रेस नसती तर तुम्ही पंतप्रधान झाला नसता...अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा मोदींवर निशाणा साधलाय...तर महाराष्ट्र ही मर्दांची भूमी असूनही कारवाईला घाबरून, अशोक चव्हाण, अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनी मोदींसमोर लोटांगण घातल्याची टीका खरगेंनी केली...धुळ्यामध्ये ते काँग्रेस आणि मविआच्या उमेदवार शोभा बच्छाव यांच्या प्रचारसभेत बोलत होते...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

12 May 2024, 18:22 वाजता

'औरंगजेब गुजरातमध्ये जन्मला होता', उद्धव ठाकरेंची टीका

 

Uddhav Thackeray : मला औरंगजेबाचे फॅन म्हणू शकत नाही.. लक्षात ठेवा मराठ्यांनी औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापले होते या शब्दांत औरंगजेबावरुन होणा-या टीकेचा उद्धव ठाकरेंनी समाचार घेतलाय.. शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुलाखत घेतली.. या मुलाखतीत आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांसोबत गेल्याने औरंगजेब फॅन्स क्लबचे मेंबर आहात का? असा सवाल संजय राऊतांनी केला होता. त्याला उद्धव ठाकरेंनीही हसत सुरुवात करत विरोधकांवर हल्लाबोल केला...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

12 May 2024, 17:16 वाजता

गोपीचंद पडळकरांनी घेतली छगन भुजबळांची भेट

 

Gopichand Padalkar visited Chhagan Bhujbal : ओबीसी नेते गोपीचंद पडळकर यांनी मंत्री छगन भुजबळांची भेट घेतलीय...नाशिकच्या भुजबळ फार्मवर पडळकरांनी भेट घेतलीय...यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये ओबीसींच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय....गेल्या काही दिवसांपासून पडळकर आणि भुजबळ ओबीसींच्या मुद्द्यावर आक्रमक झालेयत...त्यातच नाशिकमधून भुजबळांनी उमेदवारीतून माघार घेतल्याने ओबीसी समाजात नाराजी आहे...त्यामुळे पडळकरांनीही भुजबळांची भेट घेतली...यावेळी त्यांनी ओबीसींची ताकद कालही होती आजही आहे आणि आणखी वाढेल अशी प्रतिक्रिया दिली...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

12 May 2024, 16:48 वाजता

यशोमती ठाकूर यांची पोलिसांनी गाडी तपासली

 

Yashomati Thakur : माजी मंत्री यशोमती ठाकूर चांगल्याच संतापल्याचं पहायला मिळालं...पुण्यामध्ये नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी त्यांची गाडी तपासली आणि त्या चांगल्याच संतापल्या...भाजपच्या नेत्यांना पोलीस अडवता का असा सवाल त्यांनी यावेळी पोलिसांना केलाय...त्याचबरोबर काँग्रेस जिंकत असल्यामुळे भाजप अशी कारस्थानं करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय...काहीही करा जिंकणार तर धंगेकरच असंही त्या यावेळी म्हणाल्या... 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

12 May 2024, 16:31 वाजता

सरकारी कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी, ठाणे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश

 

Thane Government Employees : ठाणे जिल्ह्यात मतदानासाठी शासकीय कर्मचा-यांना भरपगारी सुट्टी देण्यात आलीये.. .20 मे रोजी ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, भिवंडी या मतदारसंघात निवडणूक आहे.. यावेळी प्रत्येकाला मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून ठाणे जिल्ह्याच्या निवडणूक अधिका-यांनी हे आदेश दिलेत.. अस्थापनांना धोका किंवा मोठ्या प्रमाणात तोटा होऊ शकतो अशा कार्यालयांना मात्र यातून वगळण्यात आल्याचं आदेशामध्ये नमूद करण्यात आलंय..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

12 May 2024, 15:54 वाजता

'उद्धव ठाकरेंना 1999 मध्येच सीएम व्हायचं होतं', देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

 

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना 1999 पासूनच सीएमपदाची स्वप्न पडू लागली होती...युतीची सत्ता येताच ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचे वेध लागले होते असा गौप्यस्फोट फडणवीसांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलाय...1999 च्या निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचे नाव पुढे येईना म्हणून त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं...नारायण राणेंना पुन्हा मुख्यमंत्री होण्यापासून रोखण्याची सोय बघितली...उद्धव ठाकरेंना जनहितापेक्षा पद महत्वाचे वाटत असावे असं फडणवीसांनी म्हटलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

12 May 2024, 15:42 वाजता

राज्यात पुढील 4 ते 5 दिवस  पावसाचा अंदाज

 

Rain Alert : राज्यात पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता...ज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट, काही ठिकाणी गारपीटीची शक्यता....हवामान विभागाचा अंदाज..

12 May 2024, 13:07 वाजता

फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं - संजय राऊत

 

Sanjay Raut On Devendra Fadanvis : फडणवीस राजकारणातलं अत्यंत कच्चं मडकं आहे...फडणवीस कॉपी करून पास झालेले विद्यार्थी आहेत असा घणाघात संजय राऊतांनी केलाय...राणे निवडून येतील असं विधान फडणवीसांनी केलं होतं...त्यावरून विचारलेल्या प्रश्नावर राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय...फडणवीसांना गांभीर्याने घेऊ नका...राणे मुख्यमंत्री होते त्यानंतर आम्ही निवडणुका हारलो होतो असं राऊतांनी म्हटलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा -