Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

14 May 2024, 21:55 वाजता

'ठाकरे-शिंदे एकत्र येणार',प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

 

Prakash Ambedkar :  उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंसोबत समझोता झाल्याचा दावा, प्रकाश आंबेडकरांनी केलाय. कल्याण लोकसभेत उद्धव ठाकरे पक्षाचा उमेदवार खरंच लढणारा आहे का, असा सवालही आंबेडकरांनी केला. लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे-शिंदे एकत्र आल्यास आश्चर्य मानू नका, असंही ते म्हणाले. 

14 May 2024, 19:27 वाजता

घाटकोपर होर्डिंगला मनपाची परवानगी नव्हती

 

Ghatkopar Hoarding Case : मुंबईत जाहिरातीसाठी होर्डिंग किंवा बॅनर लावायचे असल्यास मुंबई महापालिकेची परवानगी आवश्यक असते. मुंबईत महापालिकेने एकूण 1025 बॅनर होर्डिंग्ज लावण्यासाठी परवानगी दिलेली आहे तर 179 होर्डिंग्ज रेल्वे हद्दीत लावण्यात आलेत.. त्याची पालिकेने परवानगी दिलेली नाही.म्हणजेच ते अनधिकृत आहेत.मुंबई महापालिकेच्या नियमानुसर 40 बाय 40 होर्डिंग्जची परवानगी आहे. घाटकोपरमधील दुर्घटना झालेलं होर्डिंग्ज हे 120 बाय 120 इतकं मोठं होतं.याला पालिकेने परवानगी दिलेली नव्हती. 

14 May 2024, 19:21 वाजता

सलमानच्या घरावरील गोळीबारप्रकरणी आणखी एकाला कोठडी

 

Salman Khan House Firing Case : सलमान खान घर गोळीबार प्रकरणातील सहाव्या आरोपीला कोठडी देण्यात आली आहे. 22 मे पर्यंत हरपाल सिंहला पोलीस कोठडी मिळाली आहे. गोळीबार प्रकरणात मोहम्मद रफीक चौधरी याला 5 लाख रुपये दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. हरपलला काल हरयाणातल्या फतेहबादमधून अटक करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत विकी गुप्ता, सागर पाल, अनुज थापन, सोनू बिश्नोई, मोहम्मद रफिक चौधरी, आणि हरपालला अटक केलीय. हरपालच्या चौकशीत 4 जणांची नावं समोर आली आहत. त्यापैकी एकाला अटक करण्यात आली असून, इतर तिघांचा शोध सुरु आहे. दरम्यान अनुज थापन या आरोपीने पोलीस कस्टडीमध्ये आत्महत्या केली. याप्रकरणी थापनच्या कुटुंबीयांनी सीबीआय चौकशीची मागणी देखील केलीय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

14 May 2024, 18:22 वाजता

'जिरेटोप घातला यात पंतप्रधान मोदींचा दोष काय?', उदय सामंतांचा सवाल

 

Uday Samant : जिरेटोप घातला यात पंतप्रधान मोदींचा दोष काय?...जिरेटोपवरून कुणी राजकारण करू नये, असं आवाहन मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना केलंय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

14 May 2024, 17:35 वाजता

 पंतप्रधान मोदींना जिरेटोप घालणं प्रफुल्ल पटेलांना आलं अंगलट

 

Praful Patel : वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घातलेला जिरेटोप प्रफुल्ल पटेलांच्या चांगलाच अंगलट आलाय. प्रफुल्ल पटेल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदींना घालून त्यांचं स्वागत केलं. प्रफुल्ल पटेलांची ही कृती शिवाजी महाराजांचा अपमान करणारी असल्याची टीका हिंदू महासभेनं केली. तर उद्या पंतप्रधान मोदींना रायगडच्या सिंहासनावरही बसवणार का? असा सवाल आनंद दवेंनी केलाय. तर संभाजी ब्रिगेडनंही प्रफुल्ल पटेलांच्या या कृतीवर नाराजी व्यक्त केलीय.दरम्यान, महायुती दिल्लीच्या तख्तापुढे लाचार झालीय, असा हल्लाबोल राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं केलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

14 May 2024, 16:12 वाजता

'बारामतीत मध्यरात्रीपर्यंत बँक उघडी होती', शरद पवारांचा गंभीर आरोप

 

Sharad Pawar : निवडणुकीत पैसेवाटप झाल्यासंबंधीही शरद पवारांनी गंभीर आरोप केले.. या निवडणुकीत सत्ताधा-यांकडून कधी नव्हे इतका पैसा वाटला गेला.. बारामतीत मध्यरात्रीपर्यंत बँक उघडी होती.. असं कधी ऐकलं नव्हतं.. अशी टीका शरद पवारांनी केलीय.. 'झी २४तास'चे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत शरद पवारांनी हे आरोप केलेत..

14 May 2024, 15:21 वाजता

पुण्यात रवींद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल

 

Ravindra Dhangekar : पुण्यात रवींद्र धंगेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमाव जमवून आंदोलन करणं धंगेकरांना महागात पडलं आहे. या प्रकरणी पुण्यातील सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...मतदानाच्या आदल्या दिवशी केले होते आंदोलन 

14 May 2024, 14:31 वाजता

शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर टीका

 

Sharad Pawar : पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रात येऊन नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी अशी टीका केली होती..त्या टीकेचाही पवारांनी समाचार घेतलाय. शिवसेना-राष्ट्रवादीला नकली म्हणणं हा पोरकटपणा आहे, अशा शब्दात शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलंय. 'झी २४तास'चे संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत शरद पवारांनी मोदींच्या विधानावर टीका केलीय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

14 May 2024, 14:29 वाजता

शरद पवारांचे पंतप्रधान मोदींवर आरोप

 

Sharad Pawar : शरद पवारांनी निवडणूक आयोगासह पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप केलेत.. निवडणूक आयोगाला हाताशी धरुन पंतप्रधानांना  सोयीचं होईल अशी निवडणूक टप्प्यांची आखणी  केली गेलीय असा गंभीर आरोप पवारांनी केलाय.. 'झी २४तास'चे संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत शरद पवारांनी हे आरोप केलेत..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

14 May 2024, 13:40 वाजता

मनोज जरांगेंचा पुन्हा उपोषणाचा इशारा

 

Manoj Jarange : मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिलाय. चार जूनला सकाळी नऊ वाजता अंतरवाली सराटीतून जरांगे उपोषणाला सुरुवात करणारेत. ‘सगेसोयरे' मुद्दासाठी पुन्हा एकदा उपोषण आणि आंदोलन करणार असल्याचं जरांगेंनी सांगितलंय. आठ जूनला नारायण गडावर जरांगेंची सभा होणार आहे.  सगेसोयरे आणि ओबीसी मराठा एकच असल्याचा अध्यादेश जर सरकारने काढला नाही  तर येणारी विधानसभा निवडणूक लढवणार याचाही पुनरुच्चार जरांगेंनी केला. छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त  जरांगे आज संभाजी नगरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी हा इशारा दिला

बातमीचा व्हिडीओ पाहा -