Avinash Bhosale Bail : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंना जामीन

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Avinash Bhosale Bail : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंना जामीन

17 May 2024, 18:13 वाजता

अविनाश भोसलेंना दोन वर्षानंतर एक लाख रुपयांचा जामीन मंजूर

 

Avinash Bhosale Bail : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंना अखेर दोन वर्षानंतर जामीन मिळालाय.. एक लाख रुपयांच्या जामीनावर अविनाश भोसलेंची सुटका करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत.. अविनाश भोसले यांना 26 मे 2022 रोजी येस बँक आणि डीएचएफएल  घोटाळा प्रकरणी सीबीआयने अटक केली होती. जामीन मंजूर झाल्यानंतर अविनाश भोसले यांना परवानगीविना देशाबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसंच  तपासयंत्रणेला पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत. अविनाश भोसले हे माजी राज्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -

17 May 2024, 14:01 वाजता

'मी सुद्धा पंतप्रधानपदाचा उमेदवार होऊ शकतो', टू द पॉईंट मुलाखतीत उद्धव ठाकरेंचं विधान

 

 Uddhav Thackeray : मी सुद्धा पंतप्रधान पदाचा उमेदवार होऊ शकतो असं मोठं विधान उद्धव ठाकरेंनी केलंय.. झी २४ तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी टू द पॉईंटमध्ये उद्धव ठाकरेंच्या घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मोठं विधान केलंय.. इंडिया आघाडीकडे अनेक पंतप्रधानपदाचे चेहरे आहेत...आमचा पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरलाय, सत्ता आल्यावर कळेल असं उद्धव ठाकरेंनी या मुलाखतीत म्हटलंय.... 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

17 May 2024, 13:28 वाजता

सांगलीत शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून 3 कॅफेची तोडफोड

 

Sangli Rada : सांगलीत तीन कॅफेशॉपची तोडफोड करण्यात आलीये.. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केलीये... एका कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी केलाय. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी विश्रामबाग चौकातील तीन कॅफेशॉपची तोडफोड केलीय. पोलिसांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या 10 ते 15 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. कॅफेशॉपवर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

17 May 2024, 13:02 वाजता

बीडच्या जिजाऊ मल्टिस्टेट घोटाळा प्रकरण, आरोपींच्या यादीतून नाव वगळण्यासाठी लाच

 

Beed Jijau Multistate Scam Case : बीडच्या जिजाऊ मल्टीस्टेट घोटाळ्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आलीये. या प्रकरणात आरोपींच्या यादीतून नाव वगळण्यासाठी एका पोलीस निरीक्षकाने तब्बल एक कोटींची लाच मागितली. हरिभाऊ खाडे असं या लाचखोर पोलीस निरीक्षकांचं नाव आहे. तडजोड करण्यासाठी 30 लाख रुपये देण्याचं ठरलं होतं. त्यानुसार पाच लाखांचा पहिला हप्ता घेताना एका व्यापा-यास अटक करण्यात आलीये. तर हरिभाऊ खाडे आणि सहकारी हवालदार अद्याप फरार आहे. यानंतर लाचलुचपत विभागानं हरिभाऊ खाडेच्या घराची झडती घेतली. याठिकाणी अधिका-यांना एक कोटी आठ लाख रुपये, सोन्याची बिस्किटं आणि दागिने सापडलेत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

17 May 2024, 12:41 वाजता

हिंजवडीत धोकादायक होर्डिंग्ज

 

Hinjewadi Hoarding : आयटी पार्क असलेल्या हिंजवडीमध्येही धोकादायक होर्डिंग्सला हटवण्याची मागणी केली जातेय. गर्दी असलेल्या रस्त्याच्या कडेला उंच दोन होर्डिंग आहेत. त्यामुळे या भागातून प्रवास करणा-या नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

17 May 2024, 12:07 वाजता

'मुख्यमंत्र्यांनी आपल्याच माणसांकडून बॅग चेक केल्या',अनिल देशमुखांची मुख्यमंत्र्यांवर टीका

 

Anil Deshmukh on CM Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्याच माणसांकडून बॅग चेक करून सारवासारव करतायत, अशी टीका अनिल देशमुख यांनी केलीय. 9 बॅगांसंदर्भात संशय व्यक्त करण्यात आला होता... मात्र, दोन ते तीनचं बॅग चेक केल्याचं देशमुख म्हणाले. तर शिंदेंना आता पैसे वाटप करण्याशिवाय पर्याय नसल्याची टीकाही त्यांनी केली.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

17 May 2024, 11:25 वाजता

'2 पक्ष फोडूनही भाजपला जनाधार नाही',जयंत पाटलांचा भाजपवर निशाणा

 

Jayant Patil : राज ठाकरे आणि मोदींच्या सभेवरुन जयंत पाटलांनी टोला लगावलाय.. महाराष्ट्रातले दोन पक्ष फोडूनही जनाधार मिळत नसल्यानं आणखी एका पक्षाला जवळ केल्याचा घणाघात जयंत पाटलांनी केलाय.. मात्र 4जूननंतर महाराष्ट्रातली परिस्थीती कळेल असं ते म्हणालेत.

17 May 2024, 11:11 वाजता

'राज्याच्या शत्रूंबरोबर राज व्यासपीठावर',संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका

 

Sanjay Raut on Raj Thackeray : मोदी आणि राज ठाकरेंच्या सभेवरून खासदार संजय राऊतांनी राज ठाकरेंवर घणाघात केलाय...महाराष्ट्रात कामं केली असती तर ज्यांनी शिव्या घातल्या त्यांनाच मांडीवर घेऊन बसावं लागलं नसतं...आता महाराष्ट्राचे स्वाभिमानी म्हणतायत त्यांनाच महाराष्ट्राच्या शत्रूंच्या बरोबर व्यासपीठावर बसावं लागतंय...त्यांची 4 जूननंतर सुपारीची दुकानं बंद होणार असा घणाघात राऊतांनी केलाय...तर शिवतीर्थावर मविआची सभा होऊ नये म्हणून मोदींना बोलावण्यात आल्याची टीका राऊतांनी केलीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

17 May 2024, 10:27 वाजता

नागपुरात धोकादायक होर्डिंग्जचं ड्रोनद्वारे सर्व्हे

 

Nagpur Hoarding : नागपुरात आता धोकादायक होर्डिंग्सचं ड्रोनद्वारे सर्वेक्षण केलं जातंय. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर नागपूर महापालिका अॅक्शन मोडवर आलीये. उंचावर तसंच धोक्याच्या ठिकाणी, इमारतींवर लावण्यात आलेल्या होर्डिंगची ड्रोनद्वारे तपासणी केली जातेय. या होर्डिंग्सचा आकार, सर्व नटबोल्ट आणि वेल्डिंग भक्कम आहेत की नाही, हे सर्व ड्रोनच्या साहाय्यानं तपासलं जाणारेय. ड्रोनच्या मदतीनं 360 डिग्रीमध्ये आणि थ्री डी पद्धतीनं होर्डिंग्सचं चित्रीकरण केलं जाणारेय.

17 May 2024, 10:02 वाजता

मुंबईतील बीकेसीत मविआची आज सभा

 

Maha vikas Aghadi Sabha : एकीकडे महायुतीची शिवाजी पार्कवर आज सभा होतेय. तर दुसरीकडे मविआ देखील शक्तिप्रदर्शनासाठी सज्ज आहे. मुंबईतल्या बीकेसीवर मविआची जाहीर सभा घेण्यात येणारेय. या सभेत शरद पवारांसह उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणारेय. काँग्रेस अध्यक्ष खरगे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देखील उपस्थित राहणारेत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-