Govinda : अभिनेता गोविंदाचा शिंदे गटात प्रवेश

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Govinda : अभिनेता गोविंदाचा शिंदे गटात प्रवेश

28 Mar 2024, 22:54 वाजता

नाशिकमधून छगन भुजबळ लढणार?

 

Chhagan Bhujbal : नाशिकमधून महायुतीकडून छगन भुजबळच लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. उदयनराजेंसाठी साता-याची जागा भाजपला सोडण्यात येणार असल्यानं त्याच्या बदल्यात अजित पवारांनी नाशिकची जागा पदरात पाडून घेतल्याचं समजतंय. तर नाशिकची जागा शिंदे गटाकडेच राहावी, यासाठी विद्यमान खासदार हेमंत गोडसेंनी शक्तिप्रदर्शन करत मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. मात्र सातारा आणि नाशिक जागांवरुन भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये अदलाबदली होणार असल्याचं समजतंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

28 Mar 2024, 21:14 वाजता

खासदार नवनीत राणांच्या पोस्टरवर राज ठाकरेंचा फोटो

 

Maharashtra Politics : खासदार नवनीत राणा यांच्या पोस्टरवर राज ठाकरे यांचा फोटो दिसतोय. राणा यांनी पोस्टरवर राज यांचा फोटो...राज ठाकरेंचा राणांनी फोटो टाकल्याने चर्चांना उधाण...राज ठाकरे महायुतीत येणार का नेटकऱ्यांचा सवाल..खासदार नवनीत राणांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा देत सोशल मीडियावर वापरला राज ठाकरे यांचा फोटो..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

28 Mar 2024, 20:28 वाजता

रश्मी बर्वेंचा निवडणूक अर्ज रद्द

 

Rashmi Barve : निवडणूक आयोगानं रश्मी बर्वे यांचा निवडणूक अर्ज रद्द केलाय. जात पडताळणी समितीकडून त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द केल्यानंतर निवडणूक आयोगानं त्यांचा उमेदवारी अर्जही रद्द केलाय. रश्मी बर्वे या रामटेक मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार आहेत. त्यांचा अर्ज रद्द झाल्यानं त्यांचे पती शाम बर्वेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

28 Mar 2024, 19:24 वाजता

शिवसेना शिंदे गटाकडून 8 उमेदवारांची यादी जाहीर

 

Shinde Group Candidate List : शिवसेनेच्या शिंदे गटाच्या ८ उमेदवारांची यादी जाहीर झालीय. यात राहुल शेवाळे, श्रीरंग बारणे, प्रतापराव जाधव, सदाशिव मंडलिक, धैर्यशील माने, हेमंत पाटील या आठही विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आलीय. मात्र यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी, नाशिकचे खासदार हेमंत गोडेस, कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे यांना गॅसवर ठेवण्यात आलंय. तर ठाणे आणि उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवारही जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे दुस-या यादीची उत्कंठा अधिकच वाढलीय.  

बातमीचा व्हिडीओ पाहा-

28 Mar 2024, 18:41 वाजता

'गोविंदाचे चित्रपट आता चालत नाहीत....', जयंत पाटलांचा गोविंदाला टोला

 

Jayant Patil on Govinda : गोविंदाचे चित्रपट आता चालत नाहीत, असा टोला जयंत पाटील यांनी लगावलाय. चालणारा नट तरी घ्यायचा, असा टोला पाटलांनी लगावलाय. तर गोविंदा हा जयंत पाटलांपेक्षा चांगला अॅक्टर आहे. आणि जयंत पाटील जे बोलले, त्यांना भोगावं लागेल, असं उत्तर मुख्यमंत्री शिंदेंनी दिलंय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

28 Mar 2024, 18:11 वाजता

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांनी भरला उमेदवारी अर्ज

 

Sanjay Gaikwad : लोकसभा उमेदवारीसाठी बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी एक वेगळीच खेळी केलीय. आमदार संजय गायकवाड आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं संजय गायकवाड यांनी सांगितलंय. अर्थात संजय गायकवाडांनी अर्ज भरला असला तरी ते लोकसभा निवडणूक लढवणार का? की अर्ज मागे घेणार? याबाबत मात्र त्यांनी सस्पेन्स कायम ठेवलाय. 

28 Mar 2024, 17:41 वाजता

नारायण राणे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

 

Narayan Rane : नारायण राणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल

28 Mar 2024, 17:11 वाजता

अभिनेता गोविंदाचा शिंदे गटात प्रवेश

 

Govinda : अभिनेता गोविंदानं शिंदे गटात प्रवेश केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रात केलेल्या कामानं प्रभावित झाल्यानं शिंदे गटात येण्याचा निर्णय घेतल्याचं गोविंदानं सांगितलंय. १४ वर्षांचा वनवास संपवून आपण पुन्हा राजकीय पक्षात प्रवेश करत असल्याचं गोविंदा म्हणाला. कला आणि संस्कृती क्षेत्रातली जबाबदारी प्रामाणिकपणानं निभावेन, असं आश्वासन गोविदांनं मुख्यमंत्री शिंदेंना दिलंय. गोविंदाला उत्तर पश्चिममधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. अमोल कीर्तिकरांच्या विरोधात गोविंदा लढण्याची शक्यता आहे. 

 

28 Mar 2024, 16:28 वाजता

अभिनेता गोविंदा शिंदे गटात प्रवेश करणार?

 

Govinda : अभिनेता गोविंदा शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता..गोविंदाला शिंदे गटाकडून उमेदवारीची शक्यता...उत्तर पश्चिममधून शिंदे गटाकडून गोविंदा लढणार असल्याची सूत्रांची माहिती...गोविंदाला शिंदे गटाकडून उमेदवारीची शक्यता...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

28 Mar 2024, 15:35 वाजता

दिलीप वळसे-पाटील घरात पाय घसरून पडले, हाताला फ्रॅक्चर 

 

Accident to Dilip Walse-Patil : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे-पाटील यांना अपघात झाला. ते घरात पाय घसरून पडले. त्यामुळे त्यांच्या खुब्याला मार लागलाय तसच हाताला फ्रॅक्चर झालंय. दिलीप वळसे-पाटील यांना उपचारासाठी पुण्यातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. तिथं त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा -