Maharashtra Lok Sabha Nivadnuk Voting LIVE: उद्धव ठाकरेंच्या सभेला पावसाचा फटका, डोंबिवलीतील सभा रद्द

Maharashtra Lok Sabha Election Phase 4 Voting LIVE: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या तीन टप्प्यांनंतर आता चौथ्या टप्प्यासाठीचं मतदान पार पडणार आहे.   

Maharashtra Lok Sabha Nivadnuk Voting LIVE: उद्धव ठाकरेंच्या सभेला पावसाचा फटका, डोंबिवलीतील सभा रद्द

Maharashtra Lok Sabha Election Phase 4 Voting LIVE: पहिल्या तीन टप्प्यांनंतर लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. तर देशातील 96 मतदारसंघांमध्येही सोमवारी मतदान होतंय. महाराष्ट्रात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघांमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर, या मतदारसंघांमध्ये हाय व्होल्टेज लढती पाहायला मिळणार आहेत. पंकजा मुंडे, अमोल कोल्हे, सुजय विखे-पाटील, निलेश लंके, मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर, वसंत मोरे, संदीपान भुमरे, रावसाहेब दानवे, चंद्रकांत खैरे, रक्षा खडसे अशा दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा चौथ्या टप्प्यात पणाला लागणार आहे. तेव्हा आता मतदार राजा कुणाला कौल देतो हे 4 जूनलाच समजेल.. 

 

13 May 2024, 17:55 वाजता

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील 11 मतदारसंघात आज सकाळी 7 ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे 52.49 टक्के मतदान झालं आहे

चौथ्या टप्प्यातील एकूण 11 लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

नंदुरबार -  60.60 टक्के
जळगाव -  51.98 टक्के
रावेर - 55.36 टक्के
जालना - 58.85 टक्के
औरंगाबाद  - 54.02 टक्के
मावळ - 46.03 टक्के
पुणे - 44.90 टक्के
शिरूर -  43.89 टक्के
अहमदनगर-  53.27 टक्के
शिर्डी - 52.27 टक्के
बीड -  58.21 टक्के

13 May 2024, 17:45 वाजता

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात 5 वाजेपर्यंत झालेली मतदानाची टक्केवारी

01 अक्कलकुवा         56.40 टक्के        
02 शहादा            63.46 टक्के        
03 नंदुरबार        58.53 टक्के        
04 नवापूर            69.46 टक्के        
05 साक्री             60.25 टक्के        
06 शिरपुर            55.98 टक्के        

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात  5 वाजेपर्यंत 55.27 टक्के मतदान झाले

13 May 2024, 17:34 वाजता

उद्धव ठाकरेंच्या सभेला पावसाचा फटका, डोंबिवलीतील सभा रद्द

 

13 May 2024, 17:32 वाजता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा हेलिकॉप्ट प्रवास रद्द

हवामान खराब झाल्याने मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टर मधून जाणं टाळलं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोटारीने मुंबईला, तर अमित शाह मोटारीने मुंबई विमानतळाकडे रवाना

13 May 2024, 15:11 वाजता

राज्यातील 11 मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. राज्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 43.76 टक्के मतदानाची नोंद 

13 May 2024, 15:07 वाजता

शिर्डी - मतदान केंद्रात पक्षाचं चिन्ह असलेल्या मतदान स्लिप आढळल्याने उमेदवार संतप्त

शिर्डी लोकसभेचे महाविकासआघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी घेतला मतदान आक्षेप, मतदान स्लिप मतदान केंद्रात नेऊ देऊ नये केली मागणी, कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव मतदान केंद्रावरील प्रकार 

13 May 2024, 15:04 वाजता

श्रीरंग बारणे यांच्याकडून मतदानासाठी आवाहन

मावळ लोकसभा मतदारसंघात एक वाजेपर्यंत 27.14 टक्के मतदान झालंय. अजून ही मतदानासाठी बराच वेळ असल्याने नागरिकांनी मतदानासाठी बाहेर पडावे, असं महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी म्हटलं

13 May 2024, 14:57 वाजता

उरणमधील आगरी कोंढरी पाडा येथे मतदानावर बहिष्कार 

उरणमधील आगरी  कोंढरी पाडा या गावातील लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. 1400 मतदार संख्या असलेल्या  बहिष्कार टाकला आहे. या गावातील शेतीमध्ये खारफुटी उगवल्याने नापीक झाली आहे. हा प्रश्न न सुटल्याने ग्रामस्थनी बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे

 

13 May 2024, 12:47 वाजता

संभाजीनगरच्या शताब्दीनगरमध्ये मतदानावर बहिष्कार 

संभाजीनगरच्या शताब्दीनगरमध्ये नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय.. या भागात पाणी, रस्ते, वीज अशा मुलभूत सुविधा नाहीत.. वारंवार मागणी करुनही मुलभूत सुविधा मिळत नसल्याची तक्रार इथल्या नागरिकांनी केलीये.. त्यामुळे ठोस आश्वासन मिळेवर्यंत मतदान न करण्याचा निर्णय या स्थानिकांनी घेतलाय.. 

 

13 May 2024, 12:23 वाजता

काही काळंबेरं होण्याची शक्यता-शरद पवार पक्ष

बारामतीत लोकसभा मतदारसंघात EVM गोडाऊनचं सीसीटीव्ही बंद असल्याचा आरोप सुप्रिया सुळेंचे निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबियांनी केला होता.. झी २४ तासनं ही बातमी लावून धरली.. त्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली. आता ईव्हीएम रुमचं सीसीटीव्ही फुटेज पुन्हा सुरु झालंय.. दरम्यान रविवारपासून सीसीटीव्ही बंद असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून करण्यात आला होता..