16 बंडखोर आमदारांचं निलंबन होणार! अ‍ॅड. कामत म्हणाले, "बहुमत असलं तरी..."

दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदारांचं पाठबळ असल्याचं सांगत शिवसेने नेते एकनाथ शिंदे यांनी पक्ष नेतृत्वाला आव्हान दिलं आहे.

Updated: Jun 26, 2022, 05:17 PM IST
16 बंडखोर आमदारांचं निलंबन होणार! अ‍ॅड. कामत म्हणाले, "बहुमत असलं तरी..." title=

मुंबई: शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्याचं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदारांचं पाठबळ असल्याचं सांगत शिवसेने नेते एकनाथ शिंदे यांनी पक्ष नेतृत्वाला आव्हान दिलं आहे. यानंतर राजकीय राजकारण चांगलंच तापलं आहे. यावर शिवसेनेच्या गोटात एकच खळबळ उडाली होती. यानंतर शिवसेनेकडून कायदेशीर सल्ला घेण्यात आला. यानंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेत 16 बंडखोर आमदारांचं निलंबन होईल, असं सांगितलं आहे. 

"दोन तृतीयांश आमदारांमुळे निलंबन होत नाही हे चुकीचं आहे. दुसऱ्या पक्षात विलीन होत नाही, तोपर्यंत निलंबन कायदा लागू असतो. त्यामुळे निलंबन नोटीसीला बंडखोर आमदारांना उत्तर द्यावं लागेल. तसेच विधानसभा उपाध्यक्षांना कारवाईचे संपूर्ण अधिकार आहेत.", असं अ‍ॅड. देवदत्त कामत यांनी सांगितलं. 

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत शिवसेनेचे जवळपास 38 आमदार गुवाहटीत आहेत. त्यासोबतच त्यांना आणखी 10 अपक्ष आमदारांचा देखील पाठिंबा आहे. त्यामुळे जवळपास 50 आमदार शिंदे गटात आहेत.