गुन्हेगार अबू सालेमचे 'मोनिका ओ माय डार्लिंग'

विशेष टाडा न्यायालयाने १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात  कुख्यात अबू सालेम याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. एका बाजूला रक्ताचे पाट वहायला लावणाऱा हाच अबू सालेम इश्कातही तितकाच मश्गूल असायचा. पण, आपल्या कृत्याचा खेद ना कधी सालेमला वाटला ना त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या मोनिका बेदीला.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 7, 2017, 04:01 PM IST
गुन्हेगार अबू सालेमचे 'मोनिका ओ माय डार्लिंग' title=

मुंबई : विशेष टाडा न्यायालयाने १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात  कुख्यात अबू सालेम याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. एका बाजूला रक्ताचे पाट वहायला लावणाऱा हाच अबू सालेम इश्कातही तितकाच मश्गूल असायचा. पण, आपल्या कृत्याचा खेद ना कधी सालेमला वाटला ना त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या मोनिका बेदीला.

मुंबईत १९९३मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात २५७ लोकांचा मृत्यू झाला होता. तर, सुमारे ७१३ लोक जखमी झाले होते. न्यायालयाने बॉम्बस्फोट प्रकरणी अबू सालेम याला मुख्य आरोपी ठरवले होते. न्यायालयाने अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. खरेतर सालेमला फाशीची शिक्षाच झाली असती. पण, भारत आणि पोर्तुगाल या उभय देशात असलेला करार आडवा आला. या करारानुसार अबू सालेमला फाशी देता येत नाही. १०९०च्या दशकात बॉलिवूडमध्येही अबू सालेमच्या भीतीचे सावट असायचे. दुर्दैव असे की, याच काळात 'मोनिका ओ माय डार्लिंग' असे म्हणत त्याचे सूर अभिनेत्री मोनिका बेदीसोबत जुळू लागले होते.

अबू सालेम आणि मोनिका बेदीची ओळख एका पार्टीमध्ये झाली होती. पुढे दोघांचे हे मधूरसंबंध बराच काळ चालले. २००७ मध्ये पोर्तुगाल पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या. भारत-पोर्तुगाल गुन्हेगार हस्तांतरण करारानुसार अबू सालेमचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यात आले आणि सालेम मुंबई पोलिसांच्या कचाट्यात सापडला.