डोंगराचा भाग खचून २ वर्षाच्या मुलीचा मृत्यू, २ जण जखमी

पार्कसाईट विभागात डोंगराचा भाग खचून पाच घरांच्या पडझडीत एका दोन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. गोपाळ जंगम आणि त्यांची पत्नी छाया जंगम असे जखमींची नावे असून त्यांची दोन वर्षाची मुलगी कल्याणी जंगम हिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला आहे.

Updated: Aug 30, 2017, 12:08 AM IST
डोंगराचा भाग खचून २ वर्षाच्या मुलीचा मृत्यू, २ जण जखमी title=

विक्रोळी : पार्कसाईट विभागात डोंगराचा भाग खचून पाच घरांच्या पडझडीत एका दोन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. गोपाळ जंगम आणि त्यांची पत्नी छाया जंगम असे जखमींची नावे असून त्यांची दोन वर्षाची मुलगी कल्याणी जंगम हिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला आहे.

पार्कसाईटमधील वर्षानगर टेकडीवर राहत असलेले हे सगळे रहिवासी असून संध्याकाळी जोरदार पावसामुळे दरड ५ घरांवर कोसळली. पालिका एन विभागातर्फे या धोकादायक घरांना इतरत्र स्थलांतरित होण्यासाठी नोटीस देण्यात आल्या होत्या. परंतु गरीब रहिवासी घरे सोडून जाणार तरी कुठे असा प्रश्न असल्याने अश्या डोंगरांळ भागात मोठ्या प्रमाणात रहिवासी जीव मुठीत घेऊन राहत आहेत. सध्या पालिका एन विभागातर्फे धोकादायक वस्त्यांमधील लोकांची तात्पुरती व्यवस्था पालिका शाळांमध्ये केली गेली आहे.