१०वी आणि १२ वीसाठी आधार कार्डची सक्ती

दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी आधार कार्डची सक्ती करण्यात आले आहे. 'आधार कार्ड नसल्यास परीक्षा देता येणार नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आधार कार्ड काढले नसेल तर ते तात्काळ काढून घ्यावे लागणार आहे. अन्यथा परीक्षेला मुकावे लागेल.

Updated: Oct 24, 2017, 04:08 PM IST
१०वी आणि १२ वीसाठी आधार कार्डची सक्ती title=

मुंबई : दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी आधार कार्डची सक्ती करण्यात आले आहे. 'आधार कार्ड नसल्यास परीक्षा देता येणार नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आधार कार्ड काढले नसेल तर ते तात्काळ काढून घ्यावे लागणार आहे. अन्यथा परीक्षेला मुकावे लागेल.

दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी आधार कार्डची सक्ती करण्याबाबत राज्य मंडळाच्या परीक्षांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलेय. तसेच परीक्षा अर्जात आधार नंबर भरणे बंधनकार करण्यात आले आहे. त्यामुळे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा आणि उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी आधार कार्ड महत्वाचे असणार आहे.

रिझर्व्ह बँकचे आधारबाबत स्पष्टीकरण

दरम्यान, बँक खात्याला आधार कार्डशी संलग्न केलं जावं की नाही याबद्दलचं संभ्रम खुद्द रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दूर केलाय. रिझर्व्ह बँकेनं एक अधिसूचना जाहीर केलीय. यानुसार, बँक खात्यांना आधार कार्डशी लिंक करणं अनिवार्य आहे आणि यासाठी बँकांना आदेशांची वाट पाहू नये. 

रिझर्व्ह बँकेनं बँक खात्यांना आधार कार्डशी लिंक करण्यासंबंधी कोणतेही आदेश जाहीर केलेले नाहीत, असा दावा मीडियामध्ये केला जात होता. माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या एका याचिकेवर दिलेल्या उत्तराच्या आधारे हा दावा केला जात होता. 

केंद्रानं जून महिन्यात जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आधार कार्ड बँक खात्याला लिंक करणं गरजेचं आहे. जर तुमचं कोणत्याही बँकेत खातं आहे तर ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत तुम्हाला हे खातं आपल्या आधार क्रमांकाशी संलग्न करावं लागेल. जर आधार क्रमांक संलग्न केला नाही तर तुम्हाला ट्रान्झॅक्शन करताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. किंवा तुमचं खातंही बंद होऊ शकतं.