VIDEO : धावती लोकल पकडणं महिलाच्या जीवावर बेतलं...

...त्यांचा पाय घसरून त्या रेल्वेखाली आल्या

Updated: Jul 12, 2018, 12:15 PM IST

मुंबई : धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न करणं एका महिलेच्या जीवावर बेतलंय. आज सकाळी बोरीवली स्टेशनजवळ ही घटना घडलीय. अलका पाठारे असं मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे. बोरीवलीला लोकलमध्ये चढताना या महिलेचा मृत्यू  झालाय.

४० वर्षीय अलका पाठारे या बँकेत नोकरीला होत्या. उशीर झाला म्हणून विरारकडून चर्चगेटकडे जाणारी ९.२६ लोकल पकडण्याचा त्या प्रयत्न करत होत्या. परंतु, हा प्रयत्न असफल ठरला आणि या प्रयत्नात त्यांचा पाय घसरून त्या रेल्वेखाली आल्या.  

घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी शताब्दी रुग्णालयात महिलेचा मृतदेह पाठवलाय. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close