अँटिलियाच्या आधी अंबानी कुटुंब रहायचे या घरात ; काय आहे या घराचं वैशिष्ट्य

अंबानी कुटुंब आता राहतात जगातील सर्वात मोठ्या घरात

Updated: Aug 19, 2021, 12:18 PM IST
अँटिलियाच्या आधी अंबानी कुटुंब रहायचे या घरात ; काय आहे या घराचं वैशिष्ट्य title=

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी यांच्याकडे जवळपास 82.9 मिलियन डॉलरची संपत्ती आहे. जगातील श्रीमंतांच्या यादीत त्याचं 12 वे स्थान आहे.  आज संपूर्ण जगात त्यांची एक प्रसिद्ध उद्योगपती म्हणून ओळख आहे. मुकेश अंबानी यांनी 1985 साली त्यांनी निता अंबानीसोबत लग्न केलं. तेव्हा 
त्याचं वय फक्त 20 वर्ष होतं. मुकेश आणि निता यांना ईशा आणि अनंत अंबानी अशी तीन मुलं आहेत. मुकेश अंबानी आपल्या कुटुंबासह मुंबईत राहतात. अंबानी कुटुंब ज्या घरात राहतं ते फक्त मुंबईतील नाही तर पूर्ण जगातील दुसरं महागड आणि भव्य घर आहे.  

या घराला अँटिलिया या प्राचीन बेटाचे नाव देण्यात आले आहे. 27 मजली घरात जगातील सर्वात आधुनिक आणि आलिशान सुविधा आहेत. फार कमी लोकांना हे माहित असेल की या घरात राहण्याआधी ते त्यांचा लहान भाऊ अनिल अंबानी यांच्यासोबत 17 मजल्यांच्या घरात राहत होते.  मुकेश अंबानींच्या जुन्या घराबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. मात्र आपल्याला अँटिलियाच्या भव्यतेबद्दल माहिती आहे.

लंडनमधील बकिंघम पॅलेस नंतर अँटिलिया हे दुसरे सर्वात महागडे घर आहे. त्याची किंमत 1-2 अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे. आकाशाला स्पर्श करणाऱ्या या घराची उंची 570 मीटर आहे आणि हे घर 4 लाख स्क्वेयर फुटाचं आहे. हे घर इतके मजबूत आहे की ते 8 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा सामना करू शकतो.

या भव्य घरात प्रवेश करण्याआधी मुकेश अंबानी कुटुंबासोबत आणि छोट्या भावासोबत राहत होते. मुंबईतील सर्वात महागड्या मालमत्तांपैकी एक इमारत या दोन भावांनी खरेदी केली. हे घर कफ परेड भागातील आहे. हे तेच घर आहे ज्याला स्वर्गीय धीरू भाई अंबानी आपल्या मुलाखतीत काय घर म्हणायचे.  

या घरांमध्ये अजूनही दोन भावांचे प्रेम आहे. या घरात 17 मजले आहेत. अंबानी कुटुंबातील प्रत्येक मुलाला येथे एक मजला देण्यात आला आहे. पण जेव्हा मुकेश अंबानी यांनी अँटिलियामध्ये राहण्याचा विचार केला तेव्हा त्यांच्या आई कोकीला यांच्यासाठी फर कठीण झालं आहे. पण त्यांनी अखेर अनिल अंबानी यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला.