जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा, अमृता फडणवीस म्हणतात, राज्यात आता...

जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक, अमृता फडणवीस यांचा टोला

Updated: Nov 14, 2022, 06:01 PM IST
जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा, अमृता फडणवीस म्हणतात, राज्यात आता... title=

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jintendra Awhad) यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा झाल्यानंतर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोपानंतर (Allegation of molestation) त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. आहे.  माझ्यावर झालेला विनयभंगाचा आरोप हा राजकीय सूडबुद्धीतून करण्यात आल्याचंही आव्हाड यांनी स्पष्ट केलंय. 13 नोव्हेंबरला कळवा खाडी पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमात एका महिलने आव्हाड यांनी आपला विनयभंग केल्याचा आरोप केला होता.

अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया
या प्रकरणावर अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात आता आधीसारखं गुंडाराज राहिलेले नाही, त्यामुळे कुठलंही आंदोलन करताना डेकोरम पाळणं आवश्यक आहे अशा शब्दात अमृता फडणवीसांनी राष्ट्रवादीला टोला लगावलाय. जितेंद्र आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यनंतर राष्ट्रवादीनं आक्रमक पवित्रा घेतलाय. त्यावर बोलताना अमृता फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिलीय. तिथल्या अधिकाऱ्यांकडे त्याची तक्रार करावी, पण गुंडागर्दी करु नये, ज्या स्त्रीने तक्रार केली आहे, त्या स्त्रीला अधिक माहित आहे की नेमकं काय झालं, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

आव्हाड यांची भूमिका
जितेंद्र आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याकडे सोपवलाय. आव्हाडांच्या राजीनामा स्वीकारण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांशी (Sharad Pawar) चर्चा करुन अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिलीय. तर एकवेळ खुनाचा गुन्हा चालेल, पण 354 हा विनयभंगाच्या गुन्ह्याला आक्षेप असल्याचं आव्हाडांनी म्हटलंय. 

कार्यकर्ते आक्रमक
जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुंब्रा पोलीस स्टेशनबाहेर कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत आंदोलन केलं.  आव्हाड यांच्या पत्नी ऋता सामंत-आव्हाड यांनी कार्यकर्त्यांसोबत रास्ता रोको आंदोलन केलं. मुंब्रा पोलिसांकडे तक्रारदार महिलेविरोधात तक्रार दाखल केली. तर मुंब्रा बायपासवरही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी टायर जाळून निषेध व्यक्त केला.