अनंत अंबानीचा होणार साखरपुडा, ही आहे अनंतची गर्लफ्रेंड ?

आकाश, ईशानंतर आता अनंतचा ही होणार साखरपुडा?

Updated: May 15, 2018, 04:59 PM IST
अनंत अंबानीचा होणार साखरपुडा, ही आहे अनंतची गर्लफ्रेंड ? title=

मुंबई : एंटीलियामध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. एका मागे एक आनंदाची बातमी अंबानी कुटुंबियांना मिळत आहे. रिलायंस इंडस्ट्रीजचे चेयरमन मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीचा देखील लवकरच साखरपुडा होणार आहे. आकाश अंबानी आणि ईशा अंबानीनंतर आता अनंत अंबानीच्या साखरपुड्याची चर्चा आहे. उद्योगपती वीरेन मर्चेंट यांची मुलगी राधिक मर्चेंट सोबत त्याचा विवाह होणार असल्याची चर्चा आहे. याबाबत अजून दोघं कुटुंबियांकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

डिसेंबरमध्ये होणार विवाह 

अंबानी कुटुंबियातील तिन्ही मुलांचा विवाह एकाच दिवशी होणार असल्याचं बोललं जातंय. आकाश, ईशा आणि अनंत अंबानी डिसेंबरमध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या विवाहासाठी दोन्ही कुटुंबियांची परवानगी मिळालेली आहे. पुढच्या महिन्यात अनंतचा साखरपुडा होणार आहे.

एक ट्विटने सुरु झाल्या चर्चा

गुजरातमध्ये द हिंदू वृत्तपत्राचे रिपोर्टर महेश लांगा यांनी 9 मेला एक ट्विट केलं होतं. ज्यामध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट लवकरच साखरपुडा करणार आहेत असं म्हटलं होतं. 

मुकेश अंबानी, Mukesh Ambani, Radhika Merchant, Anant Ambani, Isha Ambani, Who is Radhika Merchant

ईशाच्या साखरपुड्यात दिसली राधिका

राधिका मर्चेंट ईशाच्या साखरपुड्यात डांस करतांना दिसली होती. ईशा, श्लोका आणि राधिक एकत्र डांस करतांना दिसत होत्या. पद्मावतच्या गाण्यावर ते डांस करत होते. मागच्या आठवड्यात अनंतची बहिण ईशाचा साखरपुडा पीरामल ग्रुपचे एक्जिक्यूटिव डायरेक्टर आनंद पीरामल याच्यासोबत झाला होता. महाबळेश्वरमध्ये एका मंदिरामध्ये त्याने ईशाला प्रपोज केलं होतं.